अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
रब्बी हंगामाची पेरणी तोंडावर असताना आता त्यासाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत मात्र मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे.
ऐन पेरणीची लगबग सुरु असतानाच खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मात्र जास्तीचे पैसे देऊन खतं विकत घ्यावी लागत आहेत.
जास्तीचे पैसे मोजून खतं विकत घेतल्याशिवाय बळीराजासमोर आता दुसरा पर्यायही शिल्लक राहिलेला दिसत नाही.
खताचे नाव आधीचा दर नवीन किंमत
डीएपी – जुने दर 1200 रुपये// नवीन दर 1200 रुपये// (स्थिर आहे)
युरिया – जुने दर 266 रुपये// नवीन दर 266 रुपये// (स्थिर आहे)
10.26.26 – जुने दर 1300 रुपये// नवीन दर 1470 रुपये// (170 रुपयांची वाढ)
12.32.16 – जुने दर 1300 रुपये// नवीन दर 1470 रुपये// (170 रुपयांची वाढ)
20.20.0.13 – जुने दर 1150 रुपये// नवीन दर 1350 रुपये// (200 रुपयांनी वाढ)
15.15.15 – जुने दर 1250 रुपये// नवीन दर 1400 रुपये// (150 रुपयांची वाढ) दरम्यान,
अशा प्रकारे विविध खतांच्या किमतीत वाढ झाल्याने पेरणीच्या हंगामात बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.