अहमदनगर बातम्या

अकोले तालुक्यातील ‘या’ गावाला मिळाले तब्बल ५४ लाखांचे अनुदान; काय आहे नेमके प्रकरण …

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील उडदावणे गावाची ‘मधाचे गाव’ या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.
अकोले तालुक्याला सह्याद्रीचे सौंदर्य व निसर्गसंपदा लाभलेली आहे.

तेथे पर्यटन विकसित झालेले आहे. तेथे मधमाशीपालनास वाव असल्याने तेथील भंडारदरा, मुरशेत व इतर गावांची पाहणी करण्यात आली. कृषी विभागाची मदत घेण्यात आली. त्यानंतर यात अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील उडदावणे गावाची निवड करण्यात आली आहे.

सध्या वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावन्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मधाचा व्यवसाय सामान्य नागरिकही करू शकतो आणि त्या माध्यमातून उत्कर्ष साधू शकतो. त्यामुळे राज्यातील १६ जिल्ह्यांत मधाचे गाव उभारण्याची योजना खादी ग्रामोद्योग विभागाने हाती घेतली आहे.

मधमाश्या पालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि मध उद्योगाचा विकास करणे यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती व्हावी. यासाठी मध केंद्र योजना राबविली जात आहे.

योजनेच्या माध्यमातून एका गावाला ५४ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना मधाचा व्यवसाय थाटून उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे मधमाशीपालन हा राज्यातील एक महत्त्वाचा जोडधंदा होऊ पाहत आहे.

मधमाशा या केवळ मध आणि मेणच देत नाहीत तर त्या परपरागीकरणामुळे शेती पीक उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ करतात, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. त्यामुळे गावाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी.

यासाठी मधाचे गाव ही संकल्पना पुढे आली होती. मधाचा व्यवसाय सामान्य नागरिकही करू शकतो आणि त्या माध्यमातून उत्कर्ष साधू शकतो. यात गावातील तरुणांना मधमाशीपालनामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यांना उत्पन्नाचा शाश्वत स्रोत मिळेल. यातून गावचे एकत्रित उत्पन्न वाढणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts