अहमदनगर बातम्या

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी शहर हद्दीतील सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या इमारतीवरून एक तरूण खाली पडला.

तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो उपचारा पूर्वीच मयत झाला. याबाबत शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजललन आदवाशी वय ४० वर्षे राहणार मध्य प्रदेश हा तरूण सुमारे एक महिन्या पासून राहुरी शहरात तनपूरे काॅम्प्लेक्स येथे तिसऱ्या मजल्यावर आपल्या कुटूंबासह राहत होता. तो गवंडी मजूर म्हणून काम करून आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह करीत होता.

राहुरी शहरातील आडवी पेठ भागात तनपूरे काॅम्प्लेक्स ही सुमारे पन्नास फूट उंच इमारत आहे. राजललन आदवाशी हा तरूण दिनांक १० फेब्रुवारी रोजी त्या इमारतीच्या छतावर गेला होता.

रात्री नऊ वाजे दरम्यान तो तरूण छतावरून खाली पडला. परिसरातील काही तरूणांनी त्याला ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.

नेहमी प्रमाणे वैद्यकीय अधिकारी १५ ते २० मिनीटे उशीरा आले. तपासल्या नंतर त्याला उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात हंबरडा फोडला होता. या घटने बाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts