अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील एका तरुणाने पुणे जिल्ह्यातील एका २४ वर्षीय विवाहित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून सलग आठ महिने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला.(Ahmednagar Crime News)
या दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणीने राहुरी पोलिसांत याबाबत माहिती दिली. याबाबत अधिक माहिती अशी याघटनेतील पिडीत २४ वर्षीय तरूणी ही पुणे जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
काही दिवसांपूर्वी तिची ओळख राहुरी तालुक्यातील रोहित अशोक पवार या तरूणाबरोबर झाली. सदर तरूणी ही विवाहित असून तिला एक मुल देखिल आहे.
रोहितने या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मुलाचा संभाळ करण्याचा विश्वास दिला. त्यानंतर दि.२० एप्रिल २०२१ ते २५ डिसेंबर २०२१ या दरम्यान सदर तरूणीच्या संमतीशिवाय तिच्यावर विविध ठिकाणी बलात्कार केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून रोहित पवार याच्याविरोधात बलात्कार व अनुसूचित जाती जमाती कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.