अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : तरुणावर सपासप वार करून खून, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता एका शेतकरी तरुणाचा सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे.

ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी मध्ये घडली आहे. या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

योगेश शेळके असं मृत तरुणाचे नाव असून तो ३५ वर्षांचा असल्याची माहिती मिळाली आहे. योगेश हा शेती करत असे. हा खुनाचा थरार रात्री ३ च्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ४ अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसत त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा चिरला अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समजली आहे.

दरम्यान हा खून नेमका का झाला? कुणी केला? त्याचे वैर किंवा इतर काही गोष्टी बाबत माहिती अद्याप मिळालेली नाही.दरम्यान पोलिसांनी योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी ज्यावेळी आसपास चौकशी केली तेव्हा हत्या करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याचे समजले. त्यामुळे गुन्हेगारांची ओळख होऊ शकली नाही. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मागील काही दिवसात अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी घटना घडताना दिसत आहेत. पोलीस प्रशासन यावर कारवाई करत आहे. तरीही खुनासारख्या घटना अहमदनगर मध्ये घडत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. वरील घटनेने बेलवंडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याची हत्येची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यात लगोलग लगेच हे एक खुनाचे प्रकरण घडले आहे. दरम्यान पोलीस वरील घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts