अहमदनगर बातम्या

जिल्हा परिषदेची १३ ठेकेदारांसह एक मजुर सहकारी संस्था व एक ग्रामपंचायतवर कारवाई ?

Ahmednagar News : अनेकदा नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील विकासकामे केली जात नाहीत. अनेकदा निधी अभावी विकास कामे रखडली जातात. तर काही वेळा ठेकेदारांकडून देखील विकासकामे प्रलंबित ठेवली जातात. मात्र आता अशी विकासकामे प्रलंबित ठेवणे महागात पडणार आहे. कारण अहमदनगर जिल्हा परिषदेने प्रलंबित ठेवलेल्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठेकेदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेने बांधकाम विभागांतर्गत नोंदणी असलेल्या व सन २०२३ -२४ या आर्थिक वर्षामधील विकास कामे प्रलंबित ठेवलेल्या एकूण १३ ठेकेदार, एक मजुर सहकारी संस्था व एक ग्रामपंचायतवर कारवाई करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागामार्फत संगमनेर व नेवासा या तालुक्यातील एकूण १२ प्रलंबित असलेल्या कामांचे एकूण तीन ठेकेदारांवर कारवाई करण्यात आलेली असून, सदर ठेकेदारांचा परवाना एक वर्षासाठी निलंबित करणेत आलेला आहे व संबंधितांची जिल्हा परिषदेकडे जमा असलेली सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.

तसेच नेवासा, संगमनेर, अकोले व कोपरगाव या तालुक्यांतील एकूण १२ प्रलंबित असलेल्या कामांसाठी दहा ठेकेदार, एक मजुर सहकारी संस्था व एक ग्रामपंचायत यांचेवर बांधकाम उत्तर विभागामार्फत दंडात्मक व ठेकेदार नोंदणी निलंबित करणेबाबत कारवाई प्रस्तावित करणेत येत आहे.

जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागामार्फत एकूण ४८ प्रलंबित असलेल्या कामांचे ठेकेदार यांना कारणे दाखवा नोटिस देण्यात आलेली असून संबंधितांचा खुलासा प्राप्त होताच निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई प्रस्तावित करणेत येत असल्याचे जिल्हा परिषदेने पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts