राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे या तारखेपासून सुरू होणार!

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. करोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून … Read more

बातमी पावसाची : राज्यातील ह्या भागात पावसाचा जोर वाढणार…

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून चक्रीवादळाचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊन राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कुलाबा वेधशाळेतील तज्ञांनी याविषयी माहिती दिली आहे. राज्यात चक्रीवादळ धडकणार नसले तरी वाऱ्यांचा वेग अधिक असेल व … Read more

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- संगमनेरातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकेचा वापर विविध शासकीय लाभ मिळविण्यासाठी केला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली असून शिवसेनेच्या सदर पदाधिकाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या तक्रारीमुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगरसेवकासह तीन जणांविरोधात गुन्हा ! जाणून घ्या काय आहे प्रकरण

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जामखेड येथील खाजगी सावकाराकडून व्याजाने घेतलेले एक लाख रुपये परत न दिल्याने आरोपींनी फिर्यादीचे चारचाकी व एक दुचाकी वाहने पळवून नेले. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी (दि.२५) एका माजी नगरसेवकासह एकूण तीन जणांवर खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २३ सप्टेंबर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समिती कायद्यान्वये कारवाई करू

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- हंगाम २०२१-२२ सुरु झाला असून काही व्यापारी बाजार समितीचा परवाना न घेता शेतकऱ्यांना जादा भावाचे आमिष दाखवून शेतमालाचे अवैधरित्या खरेदी व्यवहार करीत आहेत. असे आढळल्यास फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समिती कायद्यान्वये कारवाई करू, अशी माहिती सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. व्यापारी विनापरवाना शेतमालाचा व्यवहार अप्रमाणित कोऱ्या पावती पुस्तकाच्या … Read more

आरोग्य विभागाची भरती परिक्षा रद्द, नुकसान भरपाई देण्याची भाजपने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- राहुरी फॅक्टरी येथील बस स्टँड समोर मद्यधुंद इसमाने नाशिक वरून नगरला जाणाऱ्या बसची समोरील काच फोडल्याची घटना घडली आहे. आज दुपारी ३ वाजता राहुरी फॅक्टरी येथे नाशिक येथून निघालेली बस नगरला जात असताना अचानक रस्त्यावर एक मद्यधुंद इसमाने त्या बसला आडव होत काचेला दगड मारले. या मध्ये बसच्या … Read more

कोपरगांवच्या लेकीची अमेरिकन बँकेत निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोपरगांवच्या गांधीनगर भागातील सर्वसामान्य कुटूंबातील लेक भाग्यश्री ज्ञानेश्वर वाल्डे हीची बँक ऑफ अमेरिका वॉशिंग्टन डी सी येथे सिनीयर टेक असोसिएट अंडर सॉफटवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाली त्याबददल तिच्या बुध्दीमत्तेचे कौतुक करावे आहे तीने यामाध्यमांतून जीवनांत आणखी प्रगती करावी असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. कुमारी … Read more

मद्यधुंद व्यक्तीने केला नगर-मनमाड मार्गावर असा प्रताप..

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- राहुरी फॅक्टरी येथील बस स्टँड समोर मद्यधुंद इसमाने नाशिक वरून नगरला जाणाऱ्या बसची समोरील काच फोडल्याची घटना घडली आहे. आज दुपारी ३ वाजता राहुरी फॅक्टरी येथे नाशिक येथून निघालेली बस नगरला जात असताना अचानक रस्त्यावर एक मद्यधुंद इसमाने त्या बसला आडव होत काचेला दगड मारले. या मध्ये बसच्या … Read more

तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या दहा जणांवर गुन्हा, चार अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोल्हार भगवतीपूर येथे तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. ही घटना गुरुवारी अंबिका नगरमध्ये घडली होती. हातात तलवारी घेऊन खुलेआम फिरणे, गावात दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या घटना कोल्हारमध्ये घडत असल्याने आश्चर्य व्यक्त … Read more

राहीबाई पोपेरे यांना लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यात नावलौकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात येणारा २०२१ चा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शरद पवार यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (२२ … Read more

दरीत उडी मारून ग्रामसेवकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका ५० वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या व्यक्तीच्या ओळखपत्रावरून तो ग्रामसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. सौताड्यात एकाच आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही पर्यटकांनी या व्यक्तीस उडी मारताना पहिल्याने त्यांनी त्यांनी … Read more

दरोड्याचा प्रयत्न फसला, चौघे दरोडेखोर पसार…

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील मेनरोड येथील व्यंकटेश मोबाईल शॉपी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने केला. त्याच दिवशी तवेरा कार वडगावपानच्या जुन्या टोल नाक्याजवळ बेवारस आढळली. हीच कार मेनरोडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. चार दरोडेखोरांनी कार सोडून ट्रकमधून पलायन केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. गुरुवारी मध्यरात्री तवेरा कार (एमएच ०४ … Read more

महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परिक्षेत नापास झाले – माजीमंत्री आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-  राज्‍यातील मंदिर उघडण्‍यासाठी महाविकास आघाडी सरकारला घटस्‍थापनेचा मुहूर्त सापडला असला तरी, केवळ भाजपच्‍या मागणीला विरोध म्‍हणून इतके दिवस मुख्‍यमंत्र्यांनी हा विषय व्‍यक्तिगत प्रतिष्‍ठेचा केला होता का? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. आरोग्‍य विभागाच्‍या परिक्षेच्‍या संदर्भात झालेल्‍या गोंधळावर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, … Read more

कोरोनाचे संकट असो की, महापुराचे लायन्सने गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला -हेमंत नाईक

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-  लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडचा पदग्रहण सोहळा सामाजिक उपक्रमाने पार पडला. लायन्स प्राईडमध्ये पदाधिकारीपदी महिलांना संधी देण्यात आली असून, गगन वधवा यांनी अध्यक्ष पदाची, रिध्दी धुप्पड यांनी सचिवपदाची तर हरमीतकौर माखीजा यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्विकारली. या कार्यक्रमात बालभवन मधील दोन गरजू घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात … Read more

कुकडी कॅनॉलमध्ये संपादित झालेल्या जमीनीचा मोबदला मिळण्यासाठी काळे कुटुंबियांचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कुकडी कॅनॉलसाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीचा निम्मा मोबदला मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त काळे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केले. तर अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सामाईक हिस्सेदार असलेल्या व्यक्तीने संपुर्ण रक्कम हडप केल्याचा आरोप करण्यात आला अहे. यावेळी अशोक काळे, चंपा पवार, महाजीद काळे, स्वाती काळे, राधा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 731 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 188 अकोले – 32 राहुरी – 32 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -31 पारनेर – 60   पाथर्डी – 62 नगर ग्रामीण … Read more

गोर-गरीबांची घरे खाली करण्याची सुपारी घेणार्‍या त्या महिला पदाधिकारी व जागा मालकावर कारवाई व्हावी

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जागा खाली करण्याची सुपारी घेऊन एक राजकीय महिला पदाधिकारी पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथे वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबियांना धमकावून राहते घर खाली करण्यासाठी धमकावत आहे. या पिडीत कुटुंबीयांना संरक्षण देऊन जागा मालक व महिला पदाधिकारीवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात … Read more