अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस करणाऱ्या राहुरी पोलिसांचा करण्यात आला सन्मान

अहिल्यानगर- बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की राहुरी पोलिस पथकाने २८ जून … Read more

जनता आपल्या कष्टातून कर भरते, त्यातूनच शासनाची तिजोरी चालते त्यामुळे अधिकाऱ्यांनी पारदर्शक सेवा द्यावी- आमदार आशुतोष काळे

कोपरगाव- जनता आपल्या कष्टातून कर भरते आणि त्या कराच्या माध्यमातून शासनाची तिजोरी भरली जाते. याच करावर शासन यंत्रणा चालते, त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने ही बाब लक्षात घेऊन पारदर्शक आणि तत्पर सेवा देणे आवश्यक आहे. प्रशासन आणि जनतेमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल दिनानिमित्त कोपरगाव … Read more

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारचा खोटेपणा उघड, अहिल्यानगर भाजपच्या वतीने न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

अहिल्यानगर- मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट घटनेत तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने निष्पापांना अडकवत मोठा अन्याय केला होता. मात्र, न्यायदेवता ही जागृत आहे. त्यामुळेच १७ वर्षांनी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी कॉग्रेस राजवटीचा खोटेपणा पुढे आला आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर भाजपचे सरचिटणीस महेश नामदे यांनी … Read more

भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

राहाता- अहील्याबाई नगर परिसरातील उत्तर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा जलाशयाच्या शताब्दी महोत्सवासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धरणाचे संवर्धन, पर्यटनविकास आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. भंडारदरा धरणास ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय’ असे नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. यंदा … Read more

राहूरी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी, दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीची करण्यात आली सुटका

राहुरी- तालुक्यातील पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी अखेर ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत सुखरूप मिळून आली आहे. या कौतुकास्पद कामगिरीसाठी राहुरी पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात एकट्या राहुरी पोलिसांनी ७३ हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या परिवाराच्या ताब्यात दिले आहे. गुन्हा दाखल आणि तपासाची … Read more

राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेणारा पती-पत्नीला अटक, चार दिवसाची पोलिस कोठडी

राहुरी- राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय योजना मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण या पती-पत्नींना अटक करण्यात आली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या या साखळीचा तपास पोलीस करत असून, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी पोलीस स्टेशन … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांचा भाव तर पपईला ४ हजार रुपये भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी विविध फळांची ४८५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांना ८ हजार रुपयांपर्यंत, तर पपईला ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची १९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची … Read more

जामखेड शहरामध्ये चोरट्यांनी खताचे दुकान फोडत ३ लाखांचे खत, बियाणे व औषधे नेले चोरून

जामखेड- शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळा नंबर आठ मधील कुमटकर अॅग्रो एजन्सी या खताचे दुकान फोडून चोरट्यांनी पावने तीन लाख रुपयांची खताचे बियाणे व औषधे चोरुन नेले. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब बापु कुमटकर यांचे जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार … Read more

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गुणगौरव, समन्वयाने काम करण्याचे आमदार संग्राम जगतापांचे आवाहन

अहिल्यानगर- महसूल विभाग हा थेट जनतेच्या संपर्कात येणारा महत्त्वाचा विभाग असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात या विभागाचा मोलाचा वाटा असतो. लोकसहभाग व लोकाभिमुखता हे प्रशासनाचे खरे बळ असून राज्यासह जिल्हा विकासकामांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी महसूल विभागाने अधिक समन्वयातून काम करावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून प्रत्येक गावात … Read more

अहिल्यानगर महापालिकेच्यावतीने गणपती देखाव्यासाठी २ लाखांची बक्षिसे जाहीर, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

अहिल्यानगर- महानगरपालिका आयोजित सार्वजानिक गणेशोस्तव देखावे स्पर्धा २०२५-२०२६ यासाठी महानगरपालिकेच्या वतीने परीक्षण समिती नियुक्त करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली असून यात पाच विषयांवर आधारित देखावे व पारंपरिक मिरवणूक यासाठी २. ३२ लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले. … Read more

अहिल्यानगरमध्ये पतसंस्थेच्या नावाखाली डेली कलेक्शन करणारा तब्बल ६३ लाख रूपये घेऊन झाला पसार, गुन्हा दाखल

अहिल्यानगर- शहरातील एक डेली कलेक्शन करणाऱ्याने पतसंस्थेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन करीत गुंतवणूकदारांची तब्बल ६३ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जून २०१५ ते २९ जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संतोष हस्तीमल मावाणी (रा. दत्त मंदिराजवळ, सिव्हील हायको, सावेडी) असे … Read more

केंद्र सरकारच्या नक्शा प्रकल्पांतर्गंत शिर्डीत ड्रोनद्वारे मिळकतींचे हवाई सर्वेक्षण सुरू

शिर्डी- केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत शिर्डी नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे मिळकतींचे हवाई सर्वेक्षण सुरू झाले असून, प्रत्येक मिळकतीचे अचूक नकाशीकरण आणि माहिती संकलनाची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. नागरिकांनी आपल्या मालकीच्या जमिनीची अधिकृत कागदपत्रे जसे की सातबारा उतारा, खरेदीखत, मिळकत पत्रिका आदी सादर करून या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात … Read more

सिस्पे नंतर ट्रेझर ईन्वेस्टमेंटमध्ये अडकले ४५० कोटी; सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर : जिल्ह्यात शिर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, तोफखाना पोलीस ठाण्यात शेअर मार्केट कंपन्यांवर फसवणुकीचे दाखल असताना आता सुपा पोलीस ठाण्यात ट्रेझर ईन्वेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरोधात १ ऑगस्ट रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून २०२२ पासून आतापर्यंत सुमारे २१ हजार ३६१ गुंतवणूकदारांची ४५० कोटींची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले. मॅनेजिंग डायरेक्टर तथा … Read more

श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट

अहिल्यानगर :  श्रीगोंदे तालुक्यातील निमगांव खलू येथील प्रस्तावित दालमिया इंडिया ग्रीन व्हिजन लिमिटेडच्या ६० लाख मेट्रिक टन क्षमतेच्या सिमेंट स्टँडअलोन ग्राइंडिंग युनिट प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणामांचा विचार करता हा प्रकल्प स्थलांतरीत करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन केली. … Read more

AI टेक्नोलाॅजिमुळे अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, टेक्नालॉजी, इलेक्ट्रॉनिक्सला पसंती

अहिल्यानगर- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानामुळे (कृत्रीम बुद्धीमत्ता) सर्वच क्षेत्रात क्रांती होत आहे. त्यामुळे आता विद्यार्थी दहावी-बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम निवडतानाही दक्षता घेताना दिसतात. भविष्यातील पाऊले ओळखून विद्यार्थी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये (तंत्रनिकेतन महाविद्यालय) प्रवेश घेताना ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नालॉजी, इलेक्ट्रॉनिक्सला सर्वाधिक पसंती देत आहेत. ‘ईव्ही’ (इलेक्ट्रिक व्हेईकल) वाहनांमुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवरही मुलांच्या उड्या पडत आहेत, अशी माहिती … Read more

उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करा, पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

अहिल्यानगर- सर्वत्र पर्यावरणाची हानी होणे सुरु आहे. त्यामुळे तापमान वाढतच आहे. मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे झाले आहे. वृक्ष असतील तरच मानवजाती वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बनवून ठेवा असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. … Read more

पाथर्डी तालुक्यातील मिरी बसस्थानकाची मोठी दुरावस्था, नागरिकांचे हाल तर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

करंजी- पाथर्डी तालुक्यातील मिरी बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली असून, बसस्थानकाजवळच कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचले आहेत. एवढेच नव्हे तर बस स्थानकाच्या छतावरील पत्रेदेखील गायब झाले असून, प्रवाशांना उभे राहण्यापूर्तीदेखील जागा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अक्षरशः रस्त्यावर उभे राहून एसटी बसची वाट पहावी लागत आहे. मिरी मार्गे पाथर्डी, शेवगाव, नगर, नेवासा, तालुक्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या … Read more

अहिल्यानगर शहरातील तब्बल १२५ कोटी रूपयांची फेज टू पाणीपुरवठा योजना रखडली, संबधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाणार

अहिल्यानगर- शहरातील नागरिकांना शाश्वत व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुमारे १२५ कोटी रुपयांचा फेज टू पाणीपुरवठा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. २०१० मध्ये सुरू झालेल्या या योजनेत जलतंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा मिळावा, असा उद्देश होता. मात्र तब्बल १५ वर्षे उलटून गेल्यानंतरही ही योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. आधारभूत कामे पूर्ण, मात्र मुख्य टप्पा रखडला या … Read more