Ola Electric Scooter : देशात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलची मागणी वाढली आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक व्हेईकल वापरासाठी प्रोत्साहित केले आहे. हेच कारण आहे की, आता देशात इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर वाढू लागला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. Ola ही देखील एक प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी बनली आहे. या कंपनीचे इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय देखील आहेत.
आता या कंपनीने आपल्या ग्राहकांना नववर्षाच्या आधीच एक मोठी भेट दिली आहे. नववर्ष सुरू होण्यासाठी आणखी 20 दिवसांपेक्षा अधिकचा काळ बाकी असतानाच ओला कंपनीने आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे जर तुम्हीही नवीन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या तयारीत असाल तर ओला कंपनीने घेतलेला हा निर्णय तुमचे बरेचसे पैसे वाचवू शकणार आहे.
कोणत्या स्कूटरवर मिळणार सूट ?
Ola S1 X ही कंपनीची अलीकडेच लॉन्च झालेली एक लोकप्रिय आणि प्रीमियम रेंजची स्कूटर आहे. ही स्कूटर लॉन्च झाल्यापासून अनेक लोकांनी खरेदी केली आहे. दरम्यान या स्कूटरवर कंपनीने 20000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेत या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,09,999 रुपये आहे, परंतु कंपनीने या गाडीवर डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर आता 89,999 रुपये एक्स-शोरूम किंमतीवर उपलब्ध होऊ लागली आहे.
परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे स्वस्तात स्कूटर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सोबतच ही स्कूटर खरेदी करताना डिसेंबर महिन्यात क्रेडिट कार्डवर 5000 रुपयांची सूट आणि झिरो प्रोसेसिंग शुल्क आणि झिरो डाउन पेमेंट सारख्या ऑफर्स देखील ओला कंपनीने दिल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कंपनीने यां स्कूटरचा सेल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी 15 डिसेंबर नंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय कंपनीच्या बाईकमध्ये काही दोष असतील तर ते कमीत कमी खर्चात दुरुस्तही केले जातील, मग ती बॅटरी असो किंवा डिजाईन असो सर्व काही कमी खर्चात रिपेअर केले जाणार आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरच्या विशेषता थोडक्यात
या इलेक्ट्रिक स्कूटरला 6000 वॅटची मोटर देण्यात आली आहे, ती 3kw बॅटरीला सपोर्ट करते आणि ही इलेक्ट्रिक बाईक 7.4 तासांत पूर्ण चार्ज होते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 95 किलोमीटरची रेंज देते. इको मोडमध्ये याची रेंज 125 किलोमीटर आहे. यां नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ओडोमीटर, घोस्ट लाईट, घड्याळ, की लेस इग्निशन, फास्ट चार्जिंग, कमी बॅटरी अलर्ट, कॉल अलर्ट, कॉल मेसेजिंग या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.