भारतातील जर आपण प्रमुख कार निर्माता कंपन्या पाहिल्या तर यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते व या कंपन्यांच्या वाहनांना ग्राहकांच्या माध्यमातून देखील पसंती दिली जाते. या दोन्ही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल इंजिनमधील अनेक उत्कृष्ट अशा कार बाजारपेठेत आणल्या आहेत.
परंतु आता त्याही पुढे जात अनेक विशिष्ट असलेल्या इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च केलेले आहेत. टाटा मोटर्सने नुकतीच कुपे स्टाईल TATA Curvv EV लाँच केली व ही कार जबरदस्त स्टाईल आणि डिझाईनसह सादर केली आहे.
आता याचप्रमाणे आता तुम्हाला जर इलेक्ट्रिक कार खरेदी करायचे असेल व ती ही टाटाची तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे असे म्हणावे लागेल. कारण टाटा मोटर्स आता Nexon EV वर फार मोठ्या प्रमाणावर सूट देत असून तुम्हीही इलेक्ट्रिक कार कमीत कमी पैशांमध्ये खरेदी करू शकतात.
टाटा देत आहे Nexon EV वर मोठी सूट
टाटा मोटर्सने Nexon EV वर मोठ्या प्रमाणावर सूट दिली असून तुम्ही जर ही टाटाची इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी केली तर मोठ्या प्रमाणावर या पैशांची बचत होणार आहे. परंतु ही एक लिमिटेड टाईम ऑफर असून तुम्हाला ही ऑफर फक्त 31 ऑगस्ट पर्यंत मिळणार आहे असे देखील कंपनीने नमूद केलेले आहे.
टाटा Nexon EV च्या बेस्ट मॉडेलवर दहा हजार रुपयांची सूट मिळत आहे तर या कारच्या टॉप मॉडेलवर तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. टाटाची ही इलेक्ट्रिक कार जर तुम्ही पूर्ण चार्ज केली तर तब्बल 325 ते 465 किलोमीटर पर्यंतची रेंज ऑफर करते.
किती आहे टाटाच्या Nexon EV ची किंमत?
टाटाच्या या इलेक्ट्रिक कारची किंमत 17 लाख 49 हजार रुपयांपासून ते 17 लाख 99 हजार रुपयापर्यंत आहे. यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की ही किंमत त्याच्या मोठ्या बॅटरी पॅकसाठी आहे.
Nexon पेट्रोल मॉडेल टाटाच्या इतर कारवर देखील मिळत आहे सूट
तसेच टाटा मोटर्सच्या माध्यमातून त्यांच्या नेक्सन रेंजवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जात होती व ती अजून देखील सुरू आहे. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून जे 120 पावर देण्यास सक्षम आहे. तसेच या कारची एक्स शोरूम किंमत बघितली तर ती आठ लाखापासून ते 15 लाख 80 हजार रुपयांपर्यंत आहे.
एवढेच नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये टाटाच्या टियागो या कारवर देखील साठ हजार रुपयांची सूट दिली जात असून Tigor वर देखील 55 हजार रुपये पर्यंत पैशांची बचत तुम्ही करू शकतात व या दोन्ही कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे.
टाटाच्या माध्यमातून सफारीवर देखील एक लाख 65 हजार रुपये पर्यंतची सूट मिळत आहे. याशिवाय टाटाच्या पंचवर देखील १८ हजार रुपयांची सूट दिली जात आहे व या सवलतींबद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही टाटाच्या डीलरशी संपर्क करू शकतात.