Affordable EV Cars : दिवसेंदिवस भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे आज बाजारात कमी किमतीमध्ये जास्त रेंज देणाऱ्या कार्स लाँच होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला बाजारात कमी किमतीमध्ये तब्बल 200 ते 300 किमी रेंजसह उपलब्ध असणाऱ्या कार्सबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याच्या लाभ घेत तुम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या इलेक्ट्रिक कार्सबद्दल संपूर्ण माहिती.
MG Comet ही सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार आहे ज्याने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून आपला ठसा उमटवला आहे. साइजने टाटा नॅनोसारख्या दिसणाऱ्या या कारमध्ये चार प्रवासी प्रवास करू शकतात. कंपनीच्या वतीने यामध्ये 17.3 Kwh बॅटरी देण्यात आली आहे, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर 230 किलोमीटरपर्यंत चालवता येते. त्याची किंमत 7.98 लाख रुपयांपासून सुरू होते.
फ्रेंच कार कंपनी Citroën द्वारे भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात EC3 ऑफर केली आहे. यामध्ये कंपनीने 29.2 Kwh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर 320 किलोमीटरपर्यंत चालवता येते. Citroën EC3 इलेक्ट्रिक कारची किंमत रु. 11.50 लाख पासून सुरू होते आणि एक्स-शोरूम रु. 12.76 लाखांपर्यंत जाते.
Tiago इलेक्ट्रिक ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून खरेदी केली जाऊ शकते. त्याच्या लाँग रेंज व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10.24 लाख रुपये आहे. यामध्ये कंपनीने 24KWh बॅटरी दिली आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, Tiago इलेक्ट्रिक 315 किमी पर्यंत चालवता येते.
टाटा ने Tigor Electric ला Rs 12.49 लाख च्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केले आहे. जर तुम्ही सेडान इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल तर कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेली ही कार खूपच आरामदायक आहे. 26KWh क्षमतेची बॅटरी असलेली ही कार पूर्ण चार्ज करून 315 किलोमीटरपर्यंत चालवता येते. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 13.75 लाख रुपये आहे.
Tata ची ही इलेक्ट्रिक SUV Nexon EV Prime आहे. 30.2KWh क्षमतेची बॅटरी आणि 312 किमीची रेंज असलेली ही टाटा एसयूव्ही 14.49 लाख रुपये किमतीत खरेदी केली जाऊ शकते.
हे पण वाचा :- Laxmi Yog 2023: मकर राशीत तयार झाला लक्ष्मी योग ! आता ‘या’ राशींचे भाग्य बदलणार , मिळणार धनलाभ