Altroz CNG VS Aura CNG : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने अनेकजण नवीन कार खरेदी करताना सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांकडून त्यांच्या सीएनजी कार सादर केल्या आहेत.
तसेच दिवसेंदिवस सीएनजी कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांची सीएनजी कारची मागणी पाहता अनेक कंपन्यांकडून विविध कार सीएनजी व्हर्जनमध्ये सादर केल्या जात आहेत.
सध्या बाजारात टाटा मोटर्स आणि ह्युंदाई कंपनीच्या अनेक कार सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. टाटा मोटर्सची अल्ट्रोझ आणि ह्युंदाई कंपनीची ऑरा कार सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊया दोन्हीपैकी तुमच्यासाठी कोणती सीएनजी कार बेस्ट आहे.
टाटा अल्ट्रोझ सीएनजी
टाटा मोटर्सच्या कार दिवसेंदिवस भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत. टाटा मोटर्सकडून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची अल्ट्रोझ कार सीएनजी पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
टाटा मोटर्सची अल्ट्रोझ सीएनजी कार २६ किमी/किलो मायलेज देते. कारमध्ये 1.2-लिटर द्वि-इंधन इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये 210 लीटरची मोठी बूट स्पेस देखील देण्यात आली आहे. मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल बाह्य रीअर व्ह्यू मिरर देण्यात आले आहे. ही एक ५ सीटर कार आहे.
टाटा अल्ट्रोझ सीएनजी कारमध्ये व्हॉइस अॅक्टिव्हेटेड सनरूफ
टाटा अल्ट्रोझ सीएनजी कारमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 7.55 लाख रुपयांपासून सुरु होते.
टाटा अल्ट्रोझ सीएनजी कारचे इंजिन ७७ बीएचपी पॉवर आणि ९७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच कारमध्ये व्हॉईस अॅक्टिव्हेटेड सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट अशी नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. कारमध्ये 30 लिटरचे दोन सिलिंडर देण्यात आले आहेत.
ह्युंदाई ऑरा
ह्युंदाई ऑरा सीएनजी कार देखील ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. कारमध्ये आठ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस फोन चार्जर असे फीचर्स देण्यात आले आहेत. कार सीएनजीवर 28 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.
ह्युंदाई ऑरा सीएनजी कारमध्ये 1197 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83 PS ची पॉवर आणि 114 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या कारची एक्स शोरूम किंमत 8.13 लाख रुपयांपासून सुरु होते. कार 5 स्पीड मॅन्युअल आणि स्वयंचलित ट्रांसमिशनसह ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ह्युंदाई कंपनीकडून या कारमध्ये असले देण्यात आले आहेत. E, S, SX आणि SX(O) अशी मॉडेल सध्या बाजारात उपलब्ध आहेत. कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), एक रिव्हर्सिंग कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि हिल-स्टार्ट देण्यात आले आहे.