Ather 450 Series:- इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जर आपण बघितले तर इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीकडे गेल्या एक ते दोन वर्षापासून ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळे फिचर्स आणि किमती असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करण्यात येत आहेत.
बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्या जर बघितल्या तर यामध्ये इथर एनर्जी एक प्रसिद्ध अशी कंपनी असून नुकतेच या कंपनीने नवीन वर्षाच्या निमित्ताने Ather 450 ही इलेक्ट्रिक स्कूटरची सिरीज अपडेट केली आहे.
या अपडेटमध्ये कंपनीने अनेक नवनवीन वैशिष्ट्ये आणि नवीन रंगांचे पर्याय देखील दिले आहेत. भारतामध्ये आता या इलेक्ट्रिक स्कूटरची लॉन्चिंग नंतर बुकिंग देखील झाली आहे.
Ather 460 सिरीज मधील उत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर
1-Ather 450S- हे बेस व्हेरियंट असून याची जर रेंज पाहिली तर पूर्ण चार्ज केल्यानंतर 122 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरमध्ये 2.9 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती पूर्ण चार्ज केल्यावर 122 किलोमीटरची रेंज देईल.
यामध्ये बेसिक राईड मोड आणि कलर एलसीडी स्क्रीन आणि मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटी सारखे उत्तम अशी फीचर्स देण्यात आली आहेत.
इतकेच नाही तर प्रो पॅक व्हेरियंटमध्ये नेव्हिगेशन आणि एक्स्ट्रा रायडिंग मोड हे फीचर्स आहेत व जे स्टील व्हाईट, कॉस्मिक ब्लॅक,स्टेल्थ व्हाईट आणि बेस ग्रे व्हेरियंटमध्ये आहेत.
2-Ather 450X- या वेरियंटमध्ये 2.9 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती पूर्ण चार्ज केल्यानंतर 126 किमी पर्यंतचे रेंज देते. या वेरियंटमध्ये चार कलर पर्यायांसह आणखी तीन वेगळे कलर ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच प्रो पॅक व्हेरियंटमध्ये म्युझिक आणि कॉल साठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन करिता गुगल मॅप इंटिग्रेशन, ऑटो होल्ड आणि फाइंड माय स्कूटर यासारखे वैशिष्ट्य देण्यात आले आहेत.
3-Ather 450X(3.7 kWh)- कंपनीने या व्हेरियंटमध्ये 3.7 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे व पूर्ण चार्ज केल्यावर 161 किलोमीटर पर्यंतचे रेंज येते. या वेरियंटमध्ये बॅटरी पॅकची क्षमता वाढवली असून त्याची रेंज देखील वाढवण्यात आली आहे.
या व्हेरिएंटचा प्रो पॅक उत्तम सस्पेन्शन ट्युनिंग आणि ऍडव्हान्स रायडिंग मोडसह प्रीमियम फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. या स्कूटरची डिझाईन पूर्वीसारखीच आहे.
4-Ather 450 Apex- हे एथरचे फ्लॅगशिप मॉडेल असून जे फुल थ्रोटलमध्ये 157 किलोमीटर पर्यंतचे रेंज देण्यास सक्षम असून यामध्ये 3.7 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे व अनेक उत्तम अशी वैशिष्ट्ये देखील यामध्ये आहेत. हे व्हेरियंट कोबाल्ट ब्लू आणि पेस्टल ऑरेंज कलर मध्ये उपलब्ध आहे.
व्हेरिएंटनुसार किमती
1-एथर 460S- किंमत एक लाख 29 हजार 999 रुपये आहे.
2-Ather 460S प्रो पॅक– किंमत एक लाख 43 हजार 999 रुपये
3-एथर 450X 2.9 kWh- किंमत एक लाख 46 हजार 999 रुपये
4- एथर 450X 2.9 kWh प्रो पॅक- किंमत एक लाख 63 हजार 999 रुपये
5- एथर 450X 3.7 kWh- किंमत एक लाख 56 हजार 999 रुपये
6-एथर 450X 3.7 kWh प्रो पॅक- किंमत एक लाख 76 हजार 999 रुपये
7-एथर 450 अपेक्स- किंमत एक लाख 99 हजार 999 रुपये