ऑटोमोबाईल

Bajaj Pulsar 150 : अवघ्या 20 हजारांत घरी न्या बजाजची ‘ही’ शक्तिशाली बाईक, कोठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या

Bajaj Pulsar 150 : तुम्ही दररोज रस्त्यांवर वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या बाईक्स पाहत असाल. या प्रत्येक बाईकची किंमत वेगवेगळी असते. इतकेच नाही तर या बाईकमध्ये फीचर्स आणि मायलेजही वेगळे असते. सध्या बाईक खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

काही दिवसांपूर्वी बजाजने आपली Bajaj Pulsar 150 बाईक बाजारात आणली होती. जिची किंमत 1.17 लाख ते 1.20 लाख रुपये इतकी आहे. परंतु जर तुमच्याकडे इतके पैसे नसतील तर चिंता करू नका. तुम्ही बाईक अवघ्या 20 हजारांत खरेदी करू शकता.

समजा आता तुम्ही शोरूममधून बजाज पल्सर 150 खरेदी केल्यास त्यासाठी तुम्हाला 1.17 लाख ते 1.20 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु जर तुम्हाला ही बाईक आवडली असेल परंतु तुमच्याकडे ती खरेदी करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही स्पोर्ट्स बाईकचे सेकंड हँड मॉडेल निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. बजाज पल्सर 150 च्या सेकंड हँड मॉडेल ऑनलाइन वेबसाइट्सवरून खरेदी करू शकता.

OLX वेबसाइट

सेकंड हँड बजाज पल्सर 150 ची पहिली ऑफर OLX वेबसाइटवर उपलब्ध असून या बाईकचे 2012 मॉडेल वर्ष हे दिल्ली नोंदणी क्रमांकासह सूचीबद्ध करण्यात आले आहे. या बाईकची किंमत विक्रेत्याकडून 20,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही बाईक विकत घेतल्यावर विक्रेत्याकडून तुम्हाला कोणतीही ऑफर मिळणार नाही.

QUIKR वेबसाइट

तुम्ही आता ही बाईक QUIKR वेबसाइटवर खरेदी करू शकता. हरियाणा नंबर प्लेट असणारे पल्सरचे 2014 मॉडेल याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे, ज्याची किंमत. 28,900 रुपये इतकी आहे. परंतु ही बाईक खरेदी करत असताना ग्राहकाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा कोणतीही ऑफर दिली जाणार नाही.

DROOM वेबसाइट

बजाज पल्सर 150 वर दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. या ठिकाणी दिल्ली नोंदणीसह 2013 मॉडेल पल्सर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. किमतीचा विचार केला तर या बाईकची 22,500 रुपये किंमत ठेवली आहे. जर ही बाईक तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला फायनान्स प्लॅनची ​​सुविधा मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts