Bajaj Qute car : बजाज कंपनीच्या बाईक्स सध्या तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आता कंपनीकडून त्यांची पहिली कार सादर करण्यात आली आहे. या कारची किंमत देखील खूपच कमी ठेवण्यात आली आहे. तसेच ही कार भन्नाट मायलेज देईल असा दावा करण्यात आला आहे.
बजाज कंपनीच्या या ४ सीटर कारचे नाव Qute ठेवण्यात आले आहे. या कारमध्ये कंपनीकडून अनेक हाय-टेक फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना कमी किमतीमध्ये कार उपलब्ध होणार आहे.
बजाज कंपनीकडून या कारची किंमत 2.48 लाख ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच ही कार ४३ मायलेज देईल असा देखील दावा करण्यात आला आहे. सध्या कंपनीकडून ही कार सादर करण्यात आली असून ती लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
बजाज कंपनीकडून नेहमीच ग्राहकांची आवड लक्षात घेऊन बाईक्स सादर करत असते. सध्या या कंपनीची पल्सर बाईक तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तसेच या कंपनीच्या बाईक सर्वाधिक मायलेजसाठी ओळखल्या जातात.
बजाजांकडून गेल्या काही वर्षांपूर्वी सर्वात स्वस्त स्पोर्ट बाईक पल्सर भारतात लॉन्च आहे. या बाईकला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कंपनीची प्लसर ही बाईक सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली आहे.
बजाजने सादर केली टाटा नॅनोसारखी दिसणारी स्वस्त कार
गेल्या काही वर्षांपूर्वी टाटा कंपनीकडून सर्वात स्वस्त कार लॉन्च करण्यात आली होती. आता बजाजकडून देखील अशीच एक स्वस्त कार सादर केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना बजाजकडून सर्वात स्वस्त ४ सीटर कार मिळणार आहे.
बजाज कंपनीकडून नुकतीच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून स्वस्त कार सादर करण्यात आल्याने ग्राहकांना स्वस्त कार खरेदीचा पर्याय मिळणार आहे.
Bajaj Qute कारच्या स्पेसिफिकेशन आणि किंमत
बजाज कंपनीची ही कार नॉन ट्रान्सपोर्ट वाहन श्रेणीत येते. बजाज कंपनीची ही पहिली कार असणार आहे. तसेच 2.48 लाख किंमतीमध्ये ४ सीटर कार मिळत असल्याने ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद या कारला मिळण्याची शक्यता कंपनीकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच या कारमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देखील देण्यात येऊ शकतात.
बजाज Qute शक्तिशाली इंजिनसह 43 मायलेज मिळण्याचा दावा
बजाज कंपनीची ही कार स्वस्त तर आहेच मात्र ही कार भन्नाट मायलेज देखील देईल असा दावा करण्यात येत आहे. या कारमध्ये 216cc चे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येणार आहे. ही कार ग्राहकांसाठी सीएनजी सेगमेंटमध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे.
बजाज लवकरच कारचे पेट्रोल-सीएनजी-एलपीजी व्हेरियंट देखील सादर करू शकते. पेट्रोल सेगमेंटमध्ये ही कार 21 किमीपर्यंत मायलेज देईल तर सीएनजी सेगमेंटमध्ये ही कार ४३ किमी पर्यंत मायलेज देईल.