Best CNG Car : भारतात गेल्या काही वर्षांपासून सीएनजी कारची डिमांड वाढली आहे. आधी सीएनजी कार फक्त शहरी भागातच पाहायला मिळायची. मात्र आता ग्रामीण भागातही सीएनजी कार पाहायला मिळते. अगदीच खेड्यापाड्यात देखील सीएनजी कार तुम्हाला थोड्याफार प्रमाणात का होईना पण पाहायला मिळतील. कारण की ठीक-ठिकाणी सीएनजी पंप आता उपलब्ध झाले आहेत. यामुळे याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे.
सीएनजी कार ही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत परवडणारी ठरते. कारण की, या कारची फ्युल एफिशियन्सी इतर कारच्या तुलनेत चांगली असते. विशेष म्हणजे या गाड्या पर्यावरणासाठी देखील खूपच पूरक आहेत. यामुळे शासनाकडूनही सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे.
सीएनजी गाड्या पर्यावरणासाठी पूरक तर आहेतच शिवाय खिशालाही परवडणाऱ्या असतात यामुळे अनेकजण यंदाच्या फेस्टिव्ह सीजन मध्ये सीएनजी कार खरेदी करण्याचा तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी नवीन सीएनजी कार घेणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण भारतातील तीन लोकप्रिय सीएनजी गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत.
भारतातील टॉप तीन लोकप्रिय सीएनजी कार
मारुती सुझुकी सेलेरियो : मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या भारतीय मार्केटमध्ये विकल्या जात आहेत. शहरी भाग असो की ग्रामीण भाग मारुती सुझुकीच्या गाड्या सहजतेने नजरेस पडतात. यावरून या कंपनीची लोकप्रियता आपल्या लक्षात येते.
विशेष म्हणजे कंपनीच्या अनेक सीएनजी गाड्या देखील भारतीय कार मार्केटमध्ये आपला दबदबा बनवून आहेत. सेलेरियो ही अशीच एक CNG कार आहे. विशेष बाब अशी की, ही गाडी भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या सीएनजी कारपैकी एक आहे.
मारुती सुझुकी सेलेरियोच्या सीएनजी मॉडेलमध्ये पॉवरट्रेन म्हणून 998cc इंजिन आहे जे 55bhp ची कमाल पॉवर आणि 82Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे आहे. मारुती सुझुकी सेलेरियोचे सीएनजी व्हेरिएंट ग्राहकांना प्रति लिटर 34 किलोमीटर मायलेज देत आहे. म्हणजेच मायलेजच्या बाबतीतही ही गाडी किफायतशीर आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर : मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओ मधील आणखी एक लोकप्रिय गाडी म्हणजे वॅगनआर. ही कार सीएनजी प्रकारात देखील उपलब्ध आहे. ही गाडी भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. मारुती सुझुकी WagonR चे CNG मॉडेल 998cc इंजिनसह सुसज्ज आहे जे 56bhp ची कमाल पॉवर आणि 82Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी 34.1 किलोमीटर प्रति किलोग्रॅम एवढे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही गाडी दमदार मायलेज मुळे ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. म्हणून जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात सीएनजी कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
मारुती सुझुकी अल्टो K10 : देशातील सर्वात स्वस्त कारच्या यादीत मारुती सुझुकी अल्टोचा समावेश होतो. ही गाडी भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच मागणीमध्ये राहिली आहे. मारुती सुझुकी अल्टो K10 चे CNG वॅरीयंट ग्राहकांना 33.85 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देत आहे.
याचे इंजिन 40.3bhp ची कमाल पॉवर आणि 60Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही गाडी मध्यमवर्गीयांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. भारतातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये या गाडीची लोकप्रियता आहे. स्वस्त किंमत, आकर्षक डिझाईन आणि दमदार मायलेज यामुळे ही गाडी दिवसेंदिवस ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे.