ऑटोमोबाईल

Best Selling Car in 2023 : Nexon, Scorpio नव्हे तर मे महिन्यात सर्वाधिक विक्रीत या कारने मारली बाजी ! पहा टॉप-10 विकल्या गेलेल्या कार

Best Selling Car in 2023 : मे महिना संपून जून महिना सुरु झाला आहे. अशा वेळी मागच्या महिन्यात विकल्या गेलेल्या कारचा रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये आघाडीची कार कोणती आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

मे महिन्यात Hyundai च्या Creta ने मे 2023 मध्ये देशात सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. Hyundai Creta ने Tata Nexon, Maruti Brezza, Punch आणि Venue यांना मागे टाकून पुन्हा नंबर-1 मिळवला आहे.

Hyundai Creta या कारने गेल्या याच कालावधीत 10,973 युनिट्सच्या तुलनेत 14,449 युनिट्सच्या विक्रीसह 32 टक्क्यांनी सकारात्मक वाढ नोंदवली आहे. त्यामुळे ग्राहकांनी अधिक पसंती दिलेल्या या कारने Tata Nexon, Maruti Suzuki Brezza, Tata Punch आणि Hyundai Venue ला मागे टाकले आहे.

Hyundai Creta गेल्या अनेक महिन्यांपासून नंबर-1 SUV आहे. याच्या अगदी खाली टाटा नेक्सॉनने नंबर-2 वर आहे. दरम्यान आज आपण टॉप-10 मध्ये कोणत्या SUV आल्या आहेत याबद्दल जाणून घेणार आहे.

टाटा नेक्सॉन नंबर-2 वर

Tata Nexon गेल्या महिन्यात 14,423 युनिट्सच्या देशांतर्गत विक्रीसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर SUV ने 2022 मध्ये याच कालावधीत 14,614 युनिट्सची विक्री केली, 1 टक्क्यांनी घट झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर मारुती ब्रेझा

मारुती सुझुकी ब्रेझाने मे 2022 मध्ये 10,312 युनिट्सच्या तुलनेत 13,398 युनिट्सची विक्री केली आहे, जी 30 टक्क्यांनी वाढीची नोंद करत आहे.

टाटा नंबर-4 वर पंच

2021 च्या मध्यात बाजारात लॉन्च झाल्यापासून टाटा पंच ही छोट्या परिवारासाठी एक प्रचंड यशस्वी SUV आहे. गेल्या महिन्यात त्याने 11,124 युनिट्सची विक्री नोंदवली, जी 9 टक्क्यांनी वाढली आहे.

Hyundai Venue No.5 वर

Hyundai Venue ने मे 2022 मध्ये 8,300 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत 10,213 युनिट्सची विक्री केली आहे, जी 23 टक्के वाढ दर्शवते. ही कार देखील ग्राहकांसाठी एक उत्तम कार आहे.

मारुती फ्रॉन्क्स आणि स्कॉर्पिओ यांची विक्री

एप्रिलमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने 9,863 युनिट्सच्या देशांतर्गत बुकिंगसह सहावे स्थान पटकावले आहे. तर, महिंद्र स्कॉर्पिओने मे 2023 मध्ये 9318 युनिट्सची देशांतर्गत विक्री करून ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. महिंद्रा स्कॉर्पिओने मे 2022 मध्ये 4,348 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. ही एक शक्तिशाली कार म्हणून ओळखली जाते.

Grand Vitara, Kia Sonet आणि XUV700

मारुती सुझुकी ग्रँड विटारा 8,877 युनिट्सच्या विक्रीसह आठव्या स्थानावर आहे, तर Kia Sonet आणि Mahindra XUV700 अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

सोनेटने मे 2022 मध्ये 7,899 युनिट्सच्या तुलनेत 8,251 युनिट्सची विक्री केली. तर, महिंद्रा XUV700 ने 2022 मध्ये याच कालावधीत 5,069 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात 5,245 युनिट्सची एकूण विक्री नोंदवली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts