ऑटोमोबाईल

Best Selling Scooter : देशात सर्वाधिक विकली जाते होंडाची ही स्कूटर, किंमतही आहे खूपच कमी

Best Selling Scooter : भारतीय बाजारात अनेक स्कुटर्स लाँच होत असतात. यामध्ये ग्राहकांना उत्तम मायलेज आणि फीचर्स उपलब्ध करून दिले जाते. यातील काही स्कुटरची किंमत कमी असते तर काही स्कुटरची किंमत खूप जास्त असते.

भारतीय बाजारात होंडा अॅक्टिव्हा स्कूटर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. इतकेच नाही तर देशातील Honda Activa ही सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर आहे. जी तुम्हीही कमी किमतीत घरी नेऊ शकता. यात कंपनीने चांगले फीचर्स दिले आहेत. या स्कुटरने बाजारात सर्वात जास्त विक्री केली आहे.

जपानी कंपनीने जुलै महिन्यात Activa च्या 1,35,327 युनिट्सची विक्री केली असून जी मागील वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 37% कमी आहे. हे लक्षात घ्या की मागील वर्षी जुलैमध्ये 2,13,807 युनिट्सची विक्री झाली होती. तर दुसरीकडे, जर आपण या वर्षीच्या जून महिन्याच्या विक्रीची तुलना केली तर जुलैमधील विक्रीत 3.44% ची वाढ झाली आहे. तसेच जून 2023 मध्ये एकूण 1,30,830 युनिट्सची विक्री झाली.

जाणून घ्या Activa 110cc बद्दल

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, Activa 110cc आणि 125cc इंजिन पर्यायांसह तुम्हाला खरेदी करता येईल. तर विक्रीमध्ये या दोन्ही आकडेवारीचा समावेश आहे. लहान इंजिन असणाऱ्या Honda Activa ला 109cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळत आहे.

जे जास्तीत जास्त 7.73bhp आणि 8.90Nm पॉवर जनरेट करत आहे. किमतीचा विचार केला तर त्याची किंमत 75,347 रुपयांपासून सुरू होते आणि ती 81,348 रुपयांपर्यंत जाते. बाजारातील ती टीव्हीएस ज्युपिटर, सुझुकी ऍक्सेस, यामाहा रे झेडआर आणि हिरो प्लेजर प्लस यांसारख्या शक्तिशाली स्कूटरला टक्कर देते.

Honda Activa 125

तसेच Honda Activa 125 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79,806 रुपयांपासून सुरू होते, जी 88,979 रुपयांपर्यंत जाते, जी 8.19bhp आणि 10.4 Nm जनरेट करत आहे. ही बाजारातील सुझुकी ऍक्सेस 125, टीव्हीएस ज्युपिटर 125, यामाहा फॅसिनो 125 आणि हिरो डेस्टिनी 125 सारख्या स्कूटरशी त्याची स्पर्धा आहे. जी 55 kmpl पर्यंत मायलेज देते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts