Best SUVs : भारतीय बाजारात सध्या एसयूव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गरज ओळखून अनेक कंपन्या आता एसयूव्ही लाँच करण्यावर भर देत आहेत. जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनसह तुम्ही या एसयूव्ही खरेदी करू शकता.
भारतीय बाजारात अशा काही जबरदस्त इंजिन असणाऱ्या SUV आहेत ज्या तुम्हाला पूरग्रस्त भागातूनही सहज चालवता येतील. परंतु या कारच्या किमती इतर कारपेक्षा थोड्या जास्त आहेत. पहा किंमत आणि नावे.
जीप रॅंगलर
यादीमध्ये जीप रँग्लर दुसऱ्या क्रमांकावर असून त्याची वेडिंग क्षमता 760 मिमी इतकी आहे. ऑफ-रोडिंगसाठी उत्तम पर्याय आहे. ज्यात रुबिकॉन जास्त हार्डकोर देण्यात आले आहे. यामध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. अनेक दमदार फिचर्ससह तुम्ही ही कार 60.65 लाख रुपयांपासून ते 64.65 लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. तसेच या कारची रचना खूप मजबूत आहे.
लँड रोव्हर डिफेंडर
ही कार उच्च रेटेड वॉटर वेडिंग क्षमतेसह येत असून जे 900 मिमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही देशातील सर्व SUV मध्ये हे खूप जास्त आहे. डिफेंडर एक जबरदस्त ऑफरोडर एसयूव्ही असून ती 4×4 प्रणालीसह तुम्हाला खरेदी करता येईल. यामध्ये अनेक अनेक ऑफ रोडिंग फीचर्स दिली आहेत. त्याचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला असून पावसाळ्याच्या दिवसात जास्त पाणी आणि रस्त्यावरून जाण्यासाठी ही एक उत्तम एसयूव्ही आहे. किमतीचा विचार केला तर लँड रोव्हर डिफेंडर 130 एचएसई व्हेरियंटची किंमत 1.30 कोटी रुपये तर एक्स व्हेरिएंटची किंमत 1.41 कोटी रुपये, एचएसई डिझेलची किंमत 1.30 कोटी रुपये आणि एक्स डिझेलची किंमत 1.30 कोटी रुपये इतकी आहे.
महिंद्रा थार
या कारला खूप पसंती देण्यात येते. तिची रचना अतिशय मजबूत पद्धतीने केली आहे. ही 650 मिमीच्या वॉटर वेडिंग क्षमतेसह तुम्हाला खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या हा एक हार्डकोर ऑफ-रोडर असून यात तुम्हाला शक्तिशाली इंजिन पाहायला मिळेल. कारची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि सुमारे 16.50 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. काही दिवसांपूर्वी कारच्या किमतीत 50 हजार रुपयांनी वाढ केली आहे.
टोयोटा फॉर्च्युनर
देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या लक्झरी SUV पैकी एक आहे. ही एक अतिशय शानदार एसयूव्ही असून तिची वॉटर वेडिंग क्षमता 700 मिमी इतकी आहे. फॉर्च्युनर डिझेल आणि पेट्रोल व्हेरियंटसह येत असून हे 4×2 आणि 4×4 प्रणालीसह तुम्हाला खरेदी करता येईल. या कारचे डिझाईन आकर्षक आहे आणि
या कारची किंमत 38.92 लाख ते 60.86 लाख रुपये इतकी आहे. कंपनीने ही कार 4×2 MT, 4×2 AT, 4×4 MT, 4×4 AT आणि L सह 5 प्रकारांत लॉन्च केली आहे.