Car Price In India : देशातील ऑटोमोबाईल सेक्टरमधील काही दिग्गज कंपन्यांनी वर्ष 2024 मध्ये आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कार बनवणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या Car च्या किंमती वाढवणार आहेत. अशातच देशातील एका नामांकित ऑटो कंपनीने आपल्या सर्वच्या सर्व कारच्या किमती तब्बल 15,000 पर्यंत वाढवू शकते असे चित्र आहे.
Citroen India ही कंपनी नवीन वर्षात ग्राहकांना जोरका झटका देणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी ही कंपनी अगदी सुरुवातीलाच अर्थातच जानेवारी 2024 पासूनच आपल्या सर्व कारच्या किमती वाढवणार आहे. यासाठी कंपनीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. Citroen ही एक फ्रेंच ऑटो कंपनी आहे. या कंपनीने हळूहळू भारतात आपला जम बसवण्यास सुरुवात केली आहे.
या कंपनीच्या ग्राहक संख्येत सातत्याने थोडी-थोडी वाढ देखील होत आहे. दरम्यान या नामांकित फ्रेंच ऑटो कंपनीने आपल्या सर्वच गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेऊन नवीन वर्षापासून किमती वाढवणाऱ्या कार उत्पादकांच्या यादीत सामील झाली आहे. या कार निर्मात्या कंपनीने भारतातील ग्राहकांना ऑफर केलेल्या सर्व मॉडेल श्रेणींच्या किमतींमध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
ही कंपनी देशात हॅचबॅक C3 व्यतिरिक्त C3 Aircross आणि C5 Aircross सारख्या SUV विकत आहे. ही कार निर्माती कंपनी भारतात eC3 इलेक्ट्रिक हॅचबॅक देखील विकत आहे. कंपनीच्या या सर्वच्या-सर्व गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. आता मात्र या कंपनीची कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना नवीन वर्षात अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. ही कंपनी आपल्या सर्व गाड्यांच्या किमती जवळपास अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.
या कंपनीने गाड्यांच्या किमती वाढवण्याबाबत कोणतेच खास कारण सांगितलेले नाही. पण आज अर्थातच 11 डिसेंबर 2023 रोजी कंपनीने नवीन वर्षात अर्थातच वर्ष 2024 मध्ये आपल्या सर्व प्रकारच्या गाड्यांच्या किमती अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत वाढू शकतात अशी माहिती दिली आहे. यामुळे या कंपनीच्या काही मॉडेल्सच्या किमती या जवळपास 15 हजारापर्यंत वाढू शकतात असा अंदाज आहे.