Discounts On Mahindra Cars : जर तुम्ही स्वतःसाठी एक आलिशान SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. सध्या, महिंद्रा मोटर्स जूनमध्ये त्यांच्या अनेक गाड्यांवर मोठा डिस्कॉऊंट देत आहे. या ऑफर अंतर्गत, 2023 XUV400 EV, XUV700 आणि Scorpio-N सारख्या मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात डिस्कॉऊंट दिला जात आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना महिंद्राच्या निवडक मॉडेल्सवर 4.4 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
Mahindra Scorpio-N वर जून महिन्यात उपलब्ध असलेल्या डिस्काउंट अंतर्गत, या SUV च्या खरेदीवर आणि 2WD पेट्रोल आणि डिझेल ट्रिमवर 60,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. यात 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. त्याच वेळी, त्याच्या 4WD डिझेल Z8 आणि Z8 L प्रकारांवर 1 लाख रुपयांपर्यंतच्या रोख सवलतीचा लाभ मिळत आहे. सध्या त्याची एक्स-शोरूम किंमत 13.60 लाख ते 24.54 लाख रुपये आहे. हे टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस आणि ह्युंदाई अल्काझार सारख्या वाहनांशी स्पर्धा करते.
डिस्काउंट ऑफरमध्ये कंपनी महिंद्राच्या XUV700 मॉडेलवर 1.5 लाख रुपयांची रोख सूट देत आहे. XUV700 मॉडेलच्या AX5 7-सीटर प्रकारावर 1.3 लाख रुपयांची रोख सवलत उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख ते 27.14 लाख रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लसशी स्पर्धा करते.
महिंद्र मोटर्स या महिन्यात आपल्या XUV400 च्या प्री-अपडेट मॉडेलवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. कंपनीला या इलेक्ट्रिक SUV वर 4.4 लाख रुपये वाचवण्याची संधी मिळत आहे, तर XUV400 ची सुरुवातीची किंमत 15.49 लाख रुपये आहे. XUV400 SUV कार 4.5kWh आणि 39.4kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. ही कार बॅटरी क्षमतेनुसार 375 किलोमीटर आणि 456 किलोमीटरची रेंज देऊ शकते.