Bike Information:- भारतामध्ये अनेक प्रसिद्ध अशा कंपन्यांच्या माध्यमातून नवनवीन बाईक निर्माण केल्या जातात व बाजारपेठेत आणल्या जातात. यामध्ये हिरो, बजाज तसेच होंडा, यामाहा यासारख्या अनेक कंपन्यांची नावे आपल्याला सांगता येतील.
या कंपन्यांच्या माध्यमातून कमीत कमी किंमत असलेल्या बाईक पासून तर काही लाखात किंमत असणाऱ्या स्टायलिश बाईक देखील तयार केल्या जातात.
बाईकच्या बाबतीत प्रत्येकाची आवड ही वेगवेगळे असते. परंतु काही व्यक्ती स्टायलिश बाईक घ्यायला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती देताना आपल्याला दिसून येतात.
ज्यांना स्टायलिश बाईक आवडते अशा ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असून कावासाकी इंडियाने देशातील दुचाकी प्रेमीकरिता एक स्टायलिश बाईक बाजारपेठेत आणली आहे. त्याच बाईकची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
कावासाकी इंडियाने आणली ‘कावासाकी एलिमीनेटर 500’
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कावासाकी इंडिया या कंपनीने बाजारपेठेमध्ये कावासाकी एलीमीनेटर 500 ही स्टायलिश बाईक बाजारपेठेत आणली असून या बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आलेले आहेत. जर या बाईकची वैशिष्ट्ये पाहिली तर याच्यामध्ये गोल हेडलॅम्प, स्लीक फ्युएल टॅंक,
एक्सपोस्ड फ्रेम आणि शॉर्ट फेंडर्स यासारखे अनेक फीचर्स दिली आहेत. एवढेच नाही तर या बाईकमध्ये व्हिज्युअल हायलाईटचा समावेश करण्यात आला आहे. सीटची उंची पाहिली तर ती 735 मीमी असून लांब हँडलबार आणि मध्यभागी फूटपेगसह बाईक चालवणे एकदम कम्फर्टेबल असणार आहे.
या बाईक मध्ये 451cc लिक्विड कुल्ड, पॅरेलल ट्वीन इंजिन देण्यात आले आहे. जे 44bhp आणि 42.6Nm आउटपुट तयार करते. एवढेच नाही तर हे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचद्वारे सहा स्पीड गिअर बॉक्सवर जोडण्यात आलेले आहे. क्रुझरमध्ये 18 इंच फ्रंट आणि 16 इंच मागील अलॉय व्हील असून ब्रेकिंग साठी 310 एमएम फ्रंट आणि 240mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत
जे डुएल चैनल एबीएस सह आहेत. कावासाकी एलिमेनेटर बाईकचे वजन 170 किलो असून तिचा ग्राउंड क्लिअरन्स 150 मिमी आहे. तसेच या एलिमिनेटर बाईकला कावासाकीच्या रायडोलॉजी ॲपच्या माध्यमातून सर्व एलईडी दिवे, संपूर्णपणे डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि स्मार्टफोनची कनेक्टिव्हिटी मिळते.
किती आहे कावासाकी एलिमिनेटर 500 ची किंमत?
कावासाकी एलिमिनेटर 500 या बाईकची किंमत ही 5 लाख 62 हजार( एक्स शोरूम) रुपये असल्याचे बोलले जात आहे. लवकरच या बाईकची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.