ऑटोमोबाईल

Bike News: आता कशाला पल्सर! आता घ्या ‘ही’ 55 किलोमीटर मायलेज देणारी अट्रॅक्टिव बाईक, वाचा वैशिष्ट्ये

Bike News:- भारतामध्ये अनेक दुचाकी निर्मिती कंपन्या असून प्रत्येक कंपन्यांच्या अनेक दुचाकी बाजारपेठेमध्ये वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि किमतींमध्ये उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक कंपन्यांच्या बाईक अथवा दुचाकीचे वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक बजेट आणि गरजेनुसार बाईकची निवड करणे खूप सोपे जाते.

तसेच अलीकडच्या कालावधीमध्ये बाईक परवडणाऱ्या असल्यामुळे इतर वाहनांपेक्षा बाईकला जास्त प्रमाणात पसंती देण्यात येत आहे. सध्या जर आपण ग्राहकांचा विचार केला तर साधारणपणे शंभर ते 125cc क्षमता असलेल्या बाईक्स जास्त प्रमाणात खरेदी केल्या जातात.

परंतु या व्यतिरिक्त अनेक 150cc च्या बाइक देखील बाजारामध्ये  अस्तित्वात आहेत. परंतु मायलेजच्या बाबतीत बरेचदा ग्राहकांचा अपेक्षाभंग करताना दिसून येतात. या सगळ्या बाईक्समध्ये जर आपण आकर्षक लूकवाली आणि उत्तम अशी मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी  यामाहाची एफझेडएस एफआय ही बाईक सर्वात उत्तम अशी ठरेल.

 यामाहा एफझेडएस एफआय आहे उत्तम बाईक

यामाहा एफझेडएस एफआय ही बाईक अनेक आकर्षक अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असून या बाईकमध्ये कंपनीकडून 149 सीसीचे सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन दिलेले असून हे इंजिन 12.4 बीएचपी पावर जनरेट करते. एवढेच नाही तर 13.3 एनएम टॉर्क देखील जनरेट करण्याची क्षमता या बाईकच्या इंजिन मध्ये आहे.

तसेच गिअरबॉक्स पाहिला तर या बाईकमध्ये पाच स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला असून ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 50 ते 55 किलोमीटर पर्यंतचे अवरेज अर्थात मायलेज देते असा देखील कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. हा दावा जर खरा असला तर 150cc च्या रेंजमध्ये ज्या काही बाईक आहेत

त्या सर्व बाईकमध्ये ही सर्वात जास्त मायलेज देणारी बाईक ठरते. तसेच हिची आकर्षक डिझाईन असल्यामुळे अनेक ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यामध्ये ही बाईक यशस्वी ठरली आहे. या बाईकची सीटची रचना पाहिली तर ती जास्त उंच नाही व त्यामुळे कमी उंची असलेले लोक देखील या बाईकला आरामात ड्राईव्ह करू शकतात. तसेच भरभक्कम आणि मोठ्या रुंदीचे टायर देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हॅण्डलिंग साठी ही बाईक खूप उत्तम आहे.

 किती आहे या बाईकची किंमत?

या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देण्यात आलेली असून सिंगल चॅनल एबीएस, इको इंडिकेटर आणि एव्हर्टेड एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आली आहे. तसेच फुल एलईडी हेडलाईट असून इंडिकेटर्स आणि टेल लाईट मध्ये देखील बल्ब आहे. या बाईकची मुंबईमधील ऑन रोड प्राईस किंमत पाहिली तर ती एक लाख 48 हजार 965 रुपये इतकी आहे व या बँकेच्या ब्लूटूथ मॉडेल करिता तीन हजार रुपये जास्त द्यावे लागतील. तसेच यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटीसह आणखी तीन महत्त्वाचे फीचर देखील अपग्रेडमध्ये मिळतील.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts