ऑटोमोबाईल

Bike Tips : सावधान! बाइक चालवताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर…

Bike Tips : तुमच्यापैकी अनेकांकडे बाईक असेल. परंतु बाइक चालवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण देशात दररोज अपघात होत आहेत. त्यापैकी अनेक अपघात हे बाईक चालवताना काळजी न घेतल्याने होत आहेत.

या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे देशात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहे. परंतु तरीदेखील अनेकजण याकडे लक्ष देत नाहीत आणि अपघात होतात. तुम्ही जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हे अपघात टाळता येतील.

हेडलाइट बीम

जेव्हा तुम्ही बाईक चालवत असाल तेव्हा हेडलाईट बीमचा वापर योग्य करणे खूप गरजेचे आहे. हायवेवर बाईक चालवत असताना नेहमी हाय बीमचा वापर करावा. समजा तुम्ही शहराच्या आत जात असाल किंवा ओव्हरटेक करत असल्यास तर केवळ लो बीमचा वापर करावा. तसेच सतत रस्त्यावर लक्ष ठेवा ज्यामुळे तुम्ही पुढील धोक्यांपासून सावध व्हाल आणि नेहमी सक्रिय असाल.

ओव्हरटेक टाळा

सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील कोणत्याही गाडीला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये. महत्त्वाचे म्हणजे वळणावर किंवा क्रॉसिंगवर ओव्हरटेक टाळावी. कारण ज्यावेळी कोणी तुम्हाला ओव्हरटेक करत असेल त्यावेळी तुम्हाला समोरचे काहीच स्पष्ट दिसत नाही. हे लक्षात ठेवा की मागील व्ह्यू मिरर आणि इंडिकेटरसह नेहमी उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे. ज्यावेळी तुम्ही लेन बदलणार असाल त्यावेळी अगोदर तुमच्या मागे एक नजर टाकावी. त्याशिवाय तुमची गती नेहमी तुमच्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

फोनचा वापर टाळावा

भारतातील अपघातांचे एक मुख्य कारण म्हणजे वाहन चालवताना लक्ष न देणे. वाहन चालवत असताना अपघात होतील अशा कृती नये, उदाहरणार्थ रस्त्यावरून लक्ष विचलित करणारा स्मार्टफोनचा वापर करू नये.

खराब प्रकाश असणाऱ्या रस्त्यावर घ्या अतिरिक्त काळजी

खराब प्रकाश असणाऱ्या रस्त्यावर वाहन चालवत असताना तुम्हाला अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण रात्री कार चालवणे हे एक खूप आव्हान आहे. त्यामुळे बाईकचा हेडलाईट नीट काम करतोय की नाही हे बाइक सुरु करण्यापूर्वी जाणून घ्यायला हवे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts