BMW G 310 R bike : गेल्या काही वर्षांत BMW च्या अनेक बाईक बाजारात आल्या आहेत, ज्या लोकांना खूप आवडल्या आहेत कारण त्यात जबरदस्त फीचर्स आहेत. आता कंपनीने आणखी एक बाईक लाँच केली आहे जी विशेषत: तरुणांना प्रचंड आवडली आहे.
या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स तर आहेतच, पण त्याशिवाय तिच्या आकर्षक लूकमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. BMW बहुतेक आजच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून बाईक बनवते. आजच्या तरुणाईला काय आवडते हे त्यांना चांगलेच समजले आहे.
तुम्ही जर रेसिंगचा उत्तम अनुभव देणारी बाईक शोधत असाल तर BMW G 310 R जरूर खरेदी करा. कारण त्याच्या लुक्ससोबतच त्याचे फीचर्सही चांगले आहेत.
BMW G 310 R बाईक
BMW G 310 R ही एक स्पोर्ट बाईक आहे जी उत्कृष्ट रेसिंगचा अनुभव देते. ही बाईक तरुणाईला प्रचंड आवडत आहे. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्याबद्दल सर्व काही माहित असायला हवं. चला जाणून घेऊयात सविस्तर –
BMW G 310 R बाईकचे फीचर्स व मायलेज
या बाईकमध्ये 313 सीसी लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 33.5bhp पॉवर आणि 28nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. BMW G 310 R बाइकमध्ये व्हॉइस असिस्ट नेव्हिगेशन सिस्टमसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील आहे,
जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह इंटिग्रेटेड आहे. यात क्लॉक, हाय स्पीड अलर्ट, फ्यूल गेज, स्पीडोमीटर, हेल्मेट अलर्ट, गिअर पोझिशन आणि स्टँड अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. बीएमडब्ल्यू जी 310 आर एक लिटर पेट्रोलमध्ये 30 किमी पर्यंत धावू शकते.
BMW G 310 R ची किंमत
कंपनीने या बाईकची किंमत 2,85,000 रुपये निश्चित केली आहे. ही किंमत एक्स-शोरूम आहे. ही बाईक रेसिंग ब्लू, रेसिंग रेड आणि कॉस्मिक ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.