Tata Vs Mahindra : नुकत्याच टाटा आणि महिंद्रा कपंनीने त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांच्या (SUVs) किमती कमी केल्या आहेत. या कंपन्यांनी SUV ची विक्री वाढवण्यासाठी ही किंमत कमी केली आहे.
कंपनीने सांगितले आहे की, किंमतीतील कपातीमुळे टाटा आणि महिंद्राच्या गाड्या आता स्वस्त दरात मिळणार आहेत. कपंनीने ही ऑफर 10 जुलै पासून लागू केली आहे. ही ऑफर पुढील चार महिन्यांसाठी आहे, तुम्ही ऑफर अंतर्गत Mahindra XUV700 स्वस्तात खरेदी करू शकाल.
सर्व वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या Mahindra XUV700 XUV ची सुरुवातीची किंमत आता 19.49 लाख रुपये आहे. यामध्ये तब्बल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. पूर्वी 6 सीटर AX7 पेट्रोल MT व्हेरिएंट 21.54 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध होते. परंतु आता हे मॉडेल 19.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल. 6 सीटर AX7 पेट्रोल AT व्हेरियंटची किंमत 2.05 लाख रुपयांनी कमी झाल्यानंतर आता 21.19 लाख रुपये एक्स-शोरूम आहे, 7 सीटर व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2 लाख रुपयांनी कमी झाल्यानंतर आता 20.99 लाख रुपये आहे.
महिंद्रा कंपनीने सांगितले की, किमतीतील कपातीमुळे अधिकाधिक लोकांना मालिका अनुभवण्याची संधी मिळेल. टाटा मोटर्सने त्यांच्या प्रमुख एसयूव्ही हॅरियर 14.99 लाख आणि सफारी 15.49 लाखच्या सुरुवातीच्या किमती बदलल्या आहेत, तर इतर SUV मॉडेल्सच्या किंमतीही 1.4 लाखांपर्यंत कमी केल्या आहेत.
टाटा नेक्सॉनवर कपंनीने 1.3 रुपयांपर्यंत कपात केली आहे. याशिवाय, ‘पंच’ ईव्हीच्या किमतीतही 30,000 रुपयांची कपात केली आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्सच्या किमती देखील कमी केल्या आहेत. कपंनीने हे पाऊल एसयूव्हीची विक्री वाढवण्यासाठी उचलले आहे.