ऑटोमोबाईल

टोयोटाच्या कार घ्या आणि लाखो रुपयांची सूट मिळवा

येत्या काही दिवसात सणासुदीचा कालावधी येऊन ठेपला असून यामध्ये अनेक ग्राहकांच्या माध्यमातून नवीन वाहने खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वाहनांवर अनेक प्रकारच्या बंपर सूट देखील या कालावधीत जाहीर केल्या जातात.

भारतातील कार उत्पादक कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर महिंद्रा पासून तर टाटा आणि टोयोटा या कंपन्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. या कंपन्यांच्या कारला ग्राहकांकडून विशेष पसंती दिली जात असते. यामध्ये टोयोटा ही कार उत्पादक कंपनी देखील खूप महत्त्वाची असून या कंपनीच्या कार देखील खूप आकर्षक अशा फीचर्स असलेले आहेत.

त्यामुळे या कालावधीत तुम्हाला देखील टोयोटाची कार घ्यायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सध्या टोयोटा या कार उत्पादक कंपनीने अनेक कारवर मोठ्या प्रमाणावर सूट दिलेली आहे. इतकेच नाही तर तुम्ही टोयोटाच्या काही वाहनांवर पाच लाख रुपयांपर्यंतची सूट देखील मिळवू शकतात. त्यामुळे या लेखात टोयोटाच्या माध्यमातून कुठल्या कारवर किती सूट देण्यात आली आहे याबद्दलची माहिती बघू.

 टोयोटाने या कारवर दिली आहे बंपर सूट

1- टोयोटा अर्बन क्रूजर टैसर टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या टोयोटाच्या टोयोटा अर्बन क्रूजर टैसर मॉडेलच्या महागड्या व्हेरियंटवर सुमारे पासष्ट हजार रुपयांची सूट देऊ केली असून ही एक आकर्षक फीचर्स असलेली कार आहे.

या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर नॅचरल एस्पीरेटेड  इंजिन देण्यात आले असून यासोबतच या कारमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील देण्यात आलेले आहे. देशामध्ये या कारची किंमत सुमारे सात लाख 74 हजार रुपयांपासून 13 लाख 4 हजार रुपये पर्यंत आहे.

2- टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर टोयोटाच्या माध्यमातून अर्बन क्रूजर हाय रायडर या कारवर देखील 75 हजार रुपये पर्यंतचे सूट देण्यात येत असून  ही कार देखील एक आकर्षक अशी आधुनिक फीचर्स असलेली कार आहे. या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहा एअर बॅग, इबीडी सह एबीएस, वाहन स्थिरता नियंत्रण तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल,

नऊ इंचाचा टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर तसेच हेड अप डिस्प्ले, ॲम्बिअंट इंटिरियर लाइटिंग व सात इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. या कारची सुरुवातीची किंमत 11 लाख 14 हजार रुपये ते 20 लाख 19 हजार रुपये पर्यंत आहे.

3- टोयोटा हाइलक्स टोयटा कंपनीची ही देखील एक लोकप्रिय असणारी कार असून या कारवर पाच लाख रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काही डीलरच्या माध्यमातून यापेक्षा देखील जास्तीची सूट या कारवर देण्यात येत आहे. या कारची जर किंमत पाहिली तर ती 30 लाख 40 हजार ते 37 लाख 90 हजार रुपये आहे.

4- टोयोटा गलैंजा टोयोटाच्या या कारवर 68 हजार पर्यंत सूट दिली जात असून या कारची किंमत सहा लाख 39 हजार रुपयांपासून सुरू होते तर नऊ लाख 69 हजार रुपयांपर्यंत जाते. ही कार 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह येते व ती 88.05 पावर जनरेट करते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts