Tata Nexon : जर तुम्ही टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर टाटा नेक्सॉन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. कारण सध्या कपंनी टाटा नेक्सॉनवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही ही कार कमी किंमतीत घरी आणू शकता. कपंनी या कारवर किती डिस्काउंट देत आहे, तसेच तुम्हाला यावर आणखी काय ऑफर मिळणार आहे, जाणून घेऊया…
ग्राहकांना आता टाटा नेक्सॉनच्या डिझेल मॉडेलवर 1.11 लाख रुपयांची बचत होणार आहे. खरेतर, 2024 नेक्सॉन डिझेल रेंज, जी आधी प्युअर व्हेरियंटने सुरू झाली होती, आता त्यात 2 नवीन बेस व्हेरियंट समाविष्ट केले आहेत. हे प्रकार स्मार्ट प्लस आणि स्मार्ट प्लस एस आहेत. Nexon Smart Plus आणि Smart Plus S प्रकार फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहेत. तर, हाय वेरिएंट 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड AMT पर्यायासह येतो.
टाटा ने 5-स्पीड मॅन्युअल पर्यायासह नेक्सॉन डिझेलची किंमत कमी केली आहे. Nexon Smart Plus च्या डिझेल-मॅन्युअल वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर, Smart Plus S प्रकारची किंमत 10.49 लाख रुपये आहे. हा प्रकार सनरूफसह येतो. यापूर्वी, नेक्सॉन डिझेलचा प्रारंभिक प्रकार 11.09 लाख रुपयांमध्ये उपलब्ध होता. म्हणजेच नवीन व्हेरियंटच्या आगमनाने ते खरेदी करणे 1.11 लाख रुपयांनी स्वस्त झाले आहे.
दुसरीकडे, नेक्सॉनचे पेट्रोल मॉडेल खरेदी करणेही आता स्वस्त झाले आहे. पूर्वी Nexon Smart Plus हा प्रारंभिक प्रकार होता, ज्याची एक्स-शोरूम किंमत 8.89 लाख रुपये होती. तर कंपनीने आता त्यात नवीन बेस व्हेरिएंट Smart (O) समाविष्ट केले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. याचा अर्थ आता ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 90,000 रुपये कमी खर्च करावे लागतील.