Car Price Hike : या नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प घेतलेले असतील. काही लोकांनी या नव्या वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे देखील ठरवलेले असेल. जर तुम्हीही त्यातलेच एक असाल आणि नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा तुमचाही प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे देशातील एका बड्या ऑटो कंपनीने आपल्या सर्व मॉडेलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मारुती सुझुकी ने आपल्या सर्व कारच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे जर तुम्हाला मारुती सुझुकीची कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला यासाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
विशेष म्हणजे कंपनीने वाढवलेल्या या किमतींची अंमलबजावणी आजपासूनच केली जाणार आहे. अर्थातच मारुती सुझुकी कारच्या सर्व मॉडेलच्या किमती आज 16 जानेवारी 2024 पासून महागणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण मारुती सुझुकीने कारची किंमत कितीने वाढवली आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
किती वाढणार मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किंमती
भारतातील सर्वात मोठी प्रवासी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने मंगळवारी याबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. कंपनीने सांगितले की, वाढती महागाई आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे खर्चाचा दबाव वाढला आहे. हेच कारण आहे की कंपनीने त्यांच्या सर्व मॉडेलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आज, 16 जानेवारी 2024 पासून कंपनी आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे. वाढलेल्या किमती आजपासून सर्व मॉडेल्सवर लागू होतील, असे कंपनीने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी दिल्ली येथे असलेल्या एक्स शोरूम किमतीच्या आधारावर प्रत्येक मॉडेलच्या किमतीत 0.45% एवढी वाढ करणार आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी अर्थातच एप्रिल 2023 मध्ये देखील कंपनीने असाच काहीसा निर्णय घेतलेला होता. आता पुन्हा एकदा कंपनीने आपल्या सर्व मॉडेलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना महागाईच्या काळात आणखी एक मोठा फटका सहन करावा लागणार आहे.