ऑटोमोबाईल

Car Care Tips : नवीन कार खरेदी केलीय तर सावधान! चुकूनही या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा होईल मोठे नुकसान

Car Care Tips : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांचाही नवीन कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र तुम्हीही नुकतीच नवीन कार घेतली असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

नवीन कार खरेदी केल्यानंतर अनेकांकडून चुका होत असतात. मात्र काहीवेळा या चुका तुमच्या जीवावरही बेतू शकतात. त्यामुळे नवीन कार खरेदी केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यकता आहे. चला तर जाणून घेऊया नवीन कार खरेदी केल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

वेळेवर सर्व्हिसिंग करा

अनेकदा नवीन कार खरेदी केल्यानंतर ग्राहक सर्व्हिसिंग करण्याचे विसरून जातात. मात्र नवीन कार असली तरी त्याची वेळेवर सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणाहून कार खरेदी करता त्या ठिकाणी तुम्हाला काही सर्व्हिसिंग मोफत दिल्या जातात.

मात्र या सर्व्हिसिंग मोफत असल्या तरी तुम्हाला काही प्रमाणात शुल्क भरावे लागते. जर तुम्ही तुमच्या कारची वेळेवर सर्व्हिसिंग केली नाही तर तुमच्या कारच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर सर्व्हिसिंग करणे खूप गरजेचे आहे.

ओव्हरलोडिंग टाळा

जर तुम्हीही नवीन कार खरेदी केली असेल किंवा तुमच्याकडे जुनी कार असेल तर त्यामध्ये जास्तीचे सामान ठेवणे नेहमी टाळा. कारण जर तुम्ही तुमच्या कारमध्ये ओव्हरलोड सामान भरले तर त्याचा फटका तुमच्या इंजिनला बसू शकतो.

कारमधील ओव्हरलोडमुळे तुमच्या कारचे इंजिन जास्त इंधन खर्च करेल आणि कारचे मायलेज देखील कमी होईल. तसेच तुमच्या इंजिनमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कारमध्ये कधीही ओव्हरलोड सामान ठेऊ नये.

ओव्हरस्पीडने कार चालवू नका

नवीन कार खरेदी केल्यानंतर अनेकजण उत्साहाने कार चालवत असतात. मात्र त्यांचा हाच उत्साह त्यांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे कार चालवताना कधीही ओव्हरस्पीडने कार चालवू नये.

नवीन कार घेतल्यानंतर तुमच्या इंजिनचे पार्ट व्यवस्थित सेट नसतात. त्यामुळे पहिली सर्व्हिसिंग होईपर्यंत कार नेहमी सावकाश चालवा. तसेच ओव्हरस्पीडने कार चालवणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि तुमचा अपघात देखील होऊ शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts