ऑटोमोबाईल

Car Care Tips: तुम्हीदेखील कारमधील एसी फॅनचा वेग वाढवता का? त्यामुळे मायलेज कमी होऊ शकते का? वाचा माहिती

Car Care Tips:- उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता असल्याने ज्याप्रमाणे आपण घरामध्ये उष्णतेपासून वाचण्याकरिता एसी, कुलर आणि फॅनसारख्या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये कारने प्रवास करत असतो तेव्हा शरीराला थंडावा मिळावा याकरिता कारमधील एसी मोठ्या प्रमाणावर वापरतो.

यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते व होणाऱ्या उकाड्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार येतो की जर आपण कारमधील एसीचा स्पीड वाढवला तर त्याचा मायलेजवर परिणाम होऊ शकतो व त्यासोबतच इंधन जास्त खर्च होऊ शकते. परंतु खरंच असे होते का? तर याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

 कारमध्ये एसी ऑन केल्यावर मायलेज वर काय परिणाम होतो?

आपल्याला माहित आहे की कार मधील जे काही अनेक प्रकारचे फीचर असतात ते इंजिनच्या मदतीने काम करत असतात व अगदी त्याचप्रमाणे कारमधील एसी देखील इंजिनवर ऑपरेट होत असतो. कारमधील एसी हा इंजिनला कनेक्ट असतो व ज्यामुळे कॉम्प्रेसरला पावर मिळते व गाडी सुरळीत चालत असते.

जेव्हा आपण कारमधील एसीचा वापर करतो तेव्हा थेट इंधन वापरले जाते. यावरून आपल्याला समजेल की एसी जर वापरला तर मायलेजवर फरक पडू शकतो. परंतु या व्यतिरिक्त जर एसीचा फॅनचा वेग वाढवला तर मायलेज वाढेल की कमी होईल? हा देखील प्रश्न अनेक जणांच्या मनात येतो.

 एसी फॅनचा वेग वाढवला तर मायलेजर काय परिणाम होतो?

कारचा जो काही एसी असतो त्याचे संपूर्णपणे यंत्रणा ही इंजिनला जोडलेली असते. परंतु एसीचा फॅन हा कारचा इंजिन ऐवजी बॅटरीला जोडलेला असतो. एसीची जी काही हवा असते ती एसी फॅनच्या मदतीने कारच्या आतमध्ये वितरित केली जाते.

एसीचा फॅन हा बॅटरीला जोडला जातो म्हणजेच तो इलेक्ट्रिकल सिस्टमला कनेक्ट असतो व त्याचा इंजिनशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे तुम्ही एसी फॅन कारमध्ये कितीही वेगाने चालवला तरी त्यामुळे इंधन खर्च होत नाही व त्याचा मायलेजर कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts