Car Discount Offers : तुम्ही देखील नवीन कार खरेदीचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो मार्च 2023 मध्ये तुम्हाला कार खरेदीची सुवर्णसंधी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या महिन्यात टाटा मोटर्स तिच्या लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट कार कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही बंपर डिस्कॉऊंट ऑफरचा फायदा घेऊन तुमच्यासाठी टाटा मोटर्सची कोणती कार खरेदी करू शकतात.
टाटा कडून या प्रीमियम हॅचबॅकला नेहमीच मागणी असते या महिन्यात कंपनी तिच्या सर्व पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर एकूण 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनी कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. हे जाणून घ्या Tata Altroz चा MY (मॉडेल इयर) 2022 स्टॉक पेट्रोल व्हेरिएंटवर एकूण 20,000 रुपये आणि डिझेल व्हेरिएंटवर 35,000 रुपयांच्या सवलतीसह मिळू शकतो याशिवाय, MY 2022 DCA पेट्रोल ऑटोमॅटिक Altroz ला एकूण 30,000 रुपये सूट मिळत आहे.
ऑफरनुसार Tata Tiago हॅचबॅकच्या CNG व्हेरियंटवर एकूण 30,000 रुपये आणि पेट्रोल व्हेरिएंटवर 25,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तुम्हाला MY 2022 स्टॉकमध्ये स्वारस्य असल्यास, तुम्ही CNG आणि पेट्रोल या दोन्ही व्हेरियंटमध्ये एकूण 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
कंपनी या महिन्यात Tata Tigor च्या MY 2023 पेट्रोल व्हेरियंटवर 25,000 रुपये आणि Tigor CNG वर 30,000 रुपये सूट देत आहे. दरम्यान, Tigor CNG च्या मागील वर्षी न विकलेल्या स्टॉकवर 40,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, जी पेट्रोल व्हेरियंटवर देखील उपलब्ध आहे.
सध्या सुरू असलेल्या ऑफरनुसार टाटाच्या रेंज -टॉपिंग SUV ला 2023 मॉडेलच्या सर्व व्हेरियंटमध्ये एकूण 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 25,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट समाविष्ट आहे. कंपनी Tata Motors Safari च्या 2022 मॉडेलवर 65,000 रुपयांपर्यंत (सर्व व्हेरियंटमध्ये) एकूण सूट देत आहे.
सफारी प्रमाणे Harrier MY 2023 हॅरियरला देखील मार्चमध्ये 35,000 रुपयांची सूट मिळत आहे, ज्यामध्ये 10,000 रुपयांची रोख सूट आणि 25,000 रुपयांची एक्सचेंज सूट समाविष्ट आहे. MY 2022 Harrier च्या न विकल्या गेलेल्या स्टॉकला व्हेरिएंटवर अवलंबून एकूण Rs 65,000 पर्यंत सूट मिळत आहे.
हे पण वाचा :- IMD Alert Today : सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट्स