Car Information:- बरेच जण कार घेण्याचा विचार करतात परंतु कोणती कार घ्यावी यामध्ये बरेच जण गोंधळात पडतात. कार घेताना प्रामुख्याने त्या कारची किंमत, तिचा मेंटेनन्स, कुटुंबातील असलेले सदस्य संख्या, कोणत्या उद्देशाने कार घ्यायचे आहे तो उद्देश इत्यादी बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो.
जर आपण यामध्ये सात सीटर असलेल्या कारचा विचार केला तर अनेक कॉम्पॅक्ट सात सीटर एसयूव्ही बाजारपेठेत उपलब्ध असून प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि किमती देखील वेगवेगळे आहेत. परंतु या सगळ्या सात सीटर कार पैकी जर आपण महिंद्रा बोलेरो चा विचार केला तर त्यांचा सर्वसामान्य कुटुंबांमध्ये देखील ही कार खूप पसंतीची आहे.
यामध्ये शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांकडे महिंद्रा बोलेरो हीच कार दिसून येते. तसेच मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात महिंद्रा बोलेरो ही कार विकली जाते. यामागे जर आपण त्या कारची किंमत तसेच तिची पावरफुल इंजन व मायलेजचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी खूप पावरफुल असल्यामुळे ही कार जास्त प्रमाणात विक्री होते.
जर आपण सध्याच्या बुलेरो सिरीजचा विचार केला तर यामध्ये बोलेरो नियो आणि बोलेरो या दोन कार प्रमाणात विक्री होतात व एका महिन्याला नऊ ते दहा हजार युनिट्स या कारचे विकले जातात. नेमकी यामागील कारण काय आहे म्हणजेच बोलेरो ला एवढी पसंती का मिळते? याबद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात घेऊ.
महिंद्रा बोलेरो विकत घेणे का असते फायद्याचे?
1- बोलेरोची किंमत– बोलेरोच्या दोन्ही मॉडेल्स म्हणजेच महिंद्रा बोलेरो आणि बोलेरो नियो यांच्या किमती पाहिल्या तर ती दहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच इतर ज्या काही सात सीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे त्यापेक्षाही किंमत जास्त परवडणारी आहे. जर आपण महिंद्रा बोलेरोची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ते नऊ लाख 79 हजार रुपयांपासून सुरू होते तर बोलेरो नियोची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 64 हजार रुपयांपासून सुरू होते.
2- बोलेरोमध्ये स्पेस आहे जास्त– बोलेरोची ही दोनही मॉडेल्स सात सीटर असून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चांगली स्पेस म्हणजे जागा देण्यात आलेली आहे. म्हणजेच हेडरुम तसेच लेगरूम आणि इतर वैशिष्ट्यांच्या बाबतीत ही खूप आरामदायी आहे.
3- तगडे इंजन आणि उत्तम मायलेज– महिंद्रा बोलेरोमध्ये दीड लिटर डिझेल इंजन असून जे 75 PS ची कमाल पावर आणि 210 Nm पिक टॉर्क जनरेट करते. तसेच बोलेरोचे नियो या मॉडेलमध्ये दीड लिटर डिझेल इंजन व 100 पीएस पावर आणि २६० न्यूटन मीटरचा पिक टॉर्क जनरेट करते. तसेच या दोन्ही महिंद्राच्या एसयूव्ही पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह आहेत. जर मायलेज पाहिला तर बोलेरोची इंधन कार्यक्षमता 16.0 kmpl पर्यंत असून बोलेरो नियोचे मायलेज 17.29 kmpl इतके आहे.
4- इतर सात सीटर कारपेक्षा मजबूत– जर आपण भारतीय बाजारपेठेमध्ये चांगली विक्री होणाऱ्या व इतर प्रसिद्ध अशा सात सीटर कारचा विचार केला तर यामध्ये मारुती सुझुकीची एर्टिगा आणि इको आणि रेनॉल्ट ट्रायबर या गाड्यांचा समावेश असून या गाड्यांची किंमत दहा लाख पर्यंत आहे. यामध्ये एमपीव्ही सेगमेंटचा विचार केला तर यामध्ये मारुती सुझुकीची एर्टिगा आणि ट्रायबर आणि व्हॅन सेगमेंट मध्ये इको यांचा समावेश आहे. परंतु बोलेरो सिरीज कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मध्ये एकच आहे व ती खूप मजबूत आहे. त्यामुळे देखील लहान शहरातील व खेड्यातील लोकांमध्ये बोलेरो जास्त पसंतीचे आहे.
5- भाड्याने देण्यासाठी फायदेशीर– बोलेरो कार ही वैयक्तिक वापराकरिता आणि भाड्याने देण्याकरिता देखील खूप फायद्याची अशी आहे. या कारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळणे शक्य होते. जर ही कार फायनान्स किंवा बँकेच्या माध्यमातून घेतली तरी तिचा ईएमआय या माध्यमातून आपल्याला भरता येऊ शकतो. दुसरे म्हणजे या गाडीची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार 7 सीटर असल्यामुळे देखील या दृष्टिकोनातून ही कार खूप फायद्याची आहे.