Car Loan : स्वतःची हक्काची कार खरेदी करणे अजूनही अनेकांसाठी एखाद्या स्वप्नासारखे आहे. परंतु अलीकडच्या काळात स्वस्त कारचे पर्याय कमी होत चालले आहेत. काही वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी 1 ते 1.5 लाख रुपयांमध्ये तुम्ही रुपयांमध्ये नवीन कार खरेदी करू शकत होता.
परंतु आज तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागत आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाकडे एकरकमी रक्कम असतेच असे नाही. त्यामुळे काहीजण कार लोन घेतात. जर तुम्हीही कार लोन घेत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.
समजून घ्या 20-10-4 फॉर्म्युला
कार लोनसाठी 20-10-4 फॉर्म्युला तुमच्यासाठी किती कार लोन किती योग्य आहे आणि तुम्ही किती डाउन पेमेंट करावे हे निर्धारित करण्यासाठी खूप मदत करते. हा फॉर्म्युला हे सांगते की तुम्ही कारच्या खरेदी किमतीच्या कमीत कमी 20% डाउन पेमेंट केले पाहिजे. तसेच तुमचा मासिक कार कर्ज EMI तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त नसावा आणि कार कर्ज 4 पेक्षा जास्त घेऊ नये.
जाणून घ्या फायदे
या 20-10-4 सूत्राचे खूप फायदे आहेत. सर्वात अगोदर, हे तुम्हाला कार कर्जावर कमी व्याज देण्यास मदत करते. ज्यावेळी तुम्ही जास्त डाउन पेमेंट करत असता, त्यावेळी तुम्ही दिलेली कर्जाची रक्कम कमी असते. त्यामुळे तुम्ही भरलेल्या व्याजाची रक्कमही खूप कमी असते.
इतकेच नाही तर ते तुमच्या कार लोनचा EMI कमी करण्यात मदत करते. ज्यावेळी तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त रक्कम कार लोन EMI मध्ये जाते, त्यावेळी तुमच्याकडे इतर खर्चांसाठी कमी पैसे शिल्लक राहतात. हे तुम्हाला कमी कालावधीत कारचे कर्ज क्लिअर करण्याची परवानगी देत असते, ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त होऊ शकता.
समजा तुम्ही कार लोन घेत असल्यास तर 20-10-4 फॉर्म्युला फॉलो करणे एक उत्तम कल्पना आहे. हे तुम्हाला कार लोनवर कमी व्याज देण्यास तसेच तुमच्या कार लोनचा EMI कमी करण्यात आणि तुमच्या कार कर्जाची जलद परतफेड करण्यात खूप मोठी मदत करेल.