ऑटोमोबाईल

Cheapest CNG Cars : खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये खरेदी करा 35 Kmpl मायलेज देणाऱ्या CNG कार ! पहा यादी

Cheapest CNG Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये CNG कारच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या शानदार CNG कार बाजारात सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकी कार कंपनीचा CNG कार सेगमेंट मजबूत आहे. मात्र आता टाटा मोटर्सकडून देखील मारुती सुझुकीच्या CNG कारला टक्कर देण्यासाठी नवनवीन कार लाँच केल्या जात आहेत. टाटाकडून आतापर्यंत चार CNG कार बाजारात सादर करण्यात आल्या आहेत.

CNG कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे देखील बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये देखील CNG कार खरेदी करू शकता. टाटा आणि मारुतीकडून त्यांच्या स्वस्त CNG कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकीकडून त्यांची सर्वात स्वस्त अल्टो K10 CNG कार बाजारात सादर केली आहे. कमी बजेट ग्राहकांसाठी अल्टो K10 कार उत्तम पर्याय आहे.

कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे. कारचे CNG मॉडेल 33.85 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकीची स्वस्त CNG कार खरेदी करण्याचा विचार असेल तर एस-प्रेसो कारचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. S-Presso कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.11 लाख रुपये आहे. कारचे CNG मॉडेल 32.73 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी Eeco

मारुती सुझुकीकडून त्यांची Eeco 7 सीटर फॅमिली कारमध्ये देखील CNG पर्याय दिला आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.32 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.58 लाख रुपये आहे. Eeco कारचे CNG व्हेरियंट 26.78 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टाटा टियागो

टाटा मोटर्सची Tiago CNG कार देखील अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी मस्त पर्याय आहे. Tiago कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.65 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.90 लाख रुपये आहे. Tiago CNG कार 26.49 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकीची सेलेरियो CNG कार सर्वोत्तम मायलेज देण्यास सक्षम आहे. सेलेरियो CNG कार 34.43 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. सेलेरियो कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.09 लाख रुपये आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts