Cheapest Electric Car In India : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आली आहे. विशेष म्हणजे सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करीत आहे. यामुळे आता भारतीय रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक फोर व्हीलर रस्त्यावर सहजतेने नजरेस पडू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण भारतातील सर्वात स्वस्त टॉप तीन इलेक्ट्रिक कारची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया
भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणत्या आहेत?
MG कॉमेट EV : इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे. टाटा कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार लॉन्च केल्या आहेत. मात्र भारतातील सर्वाधिक स्वस्त कार एमजी कॉमेंट ही आहे. एमजीची ही इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जाते.
ही इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यावर 230 किलोमीटर जाते. कंपनीने असा दावा केला आहे की, 519 रुपयांमध्ये ही गाडी 1000 किलोमीटर चालवली जाऊ शकते. हाती आलेल्या माहितीनुसार या गाडीची एक्स शोरूम किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरु होते.
Tata Tiago : टाटा ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सर्वाधिक कार लॉन्च करणारी कंपनी म्हणून टाटाचा गौरव होतोय. सध्या स्थितीला इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटाच्या आसपास देखील कोणी पोहचलेले नाही.
ही गाडी दोन बॅटरी पॅक सोबत येते. 19.2 Kwh बॅटरी बॅकची ही कार 250 km ची रेंज देते. 24Kwh बॅटरी पॅकची कार तब्बल 315 किलोमीटर ची रेंज देते. या गाडीची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा पंच EV : टाटा कंपनीने आपला इलेक्ट्रिक सेगमेंट आणखी मजबूत व्हावा यासाठी अलीकडेच टाटा पंच EV ही गाडी लॉन्च केली आहे. ही गाडी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते. ही गाडी लॉन्च झाल्यापासून चर्चेत आहे.
या गाडीचे फीचर्स आणि या गाडीचे लूक खूपच दमदार असून ग्राहकांमध्ये या गाडीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ही गाडी देखील दोन बॅटरी पॅक मध्ये येते. 25Kwh आणि 35 Kwh बॅटरी पॅक सोबत ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे.
25Kwh बॅटरी पॅकवाले मॉडेल 315 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 35 Kwh बॅटरी पॅकची कार 421 किलोमीटर पर्यंतची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केलेला आहे.
या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 10.99 लाख रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीसह बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. ही गाडी टाटा कंपनीची एक लोकप्रिय इलेक्ट्रिक व्हेईकल आहे.