ऑटोमोबाईल

Cheapest Electric Car : अर्ध्या तासाच्या चार्जमध्ये आठवडाभर चालणारी स्वस्त इलेक्ट्रिक कार होणार लॉन्च! हजारो लोकांनी केली बुकिंग

Cheapest Electric Car : सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर दिला जात आहे. तसेच भारतामध्ये देखील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कार, बाईक्स आणि स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलवरील कार न परवडण्यासारखे झाल्याने अनेकजण सध्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. मात्र इलेक्ट्रिक कारच्या किमती अधिक असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही.

मात्र आता ऑटो मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. तसेच कमी किमतीमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक कार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अनेक ऑटो कंपन्यांकडून केला जात आहे.

सध्या ऑटो मार्केटमध्ये सर्वात स्वस्त आणि छोटी इलेक्ट्रिक कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मायक्रोलिनो असे या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. दिसायला जरी छोटी असली तरी ही इलेक्ट्रिक कार सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारण लॉन्च होण्यापूर्वीच या इलेक्ट्रिक कारचे ३० हजार बुकिंग झाले आहे.

या स्वस्त आणि छोट्या इलेक्ट्रिक कारमध्ये फक्त २ लोक बसू शकतात. तसेच या कारमध्ये बूट स्पेस देखील देण्यात आला आहे. 230 लिटर बूट स्पेस यामध्ये देण्यात आला आहे. मायक्रोलिनो हे स्विस डिझाइन केलेली इलेक्ट्रिक कार आहे.

या इलेक्ट्रिक कारचे वजन फक्त 535 किलो आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीपर्यंत धावू शकते. तसेच ताशी 90 किमी वेगाने धावू शकणारी ही इलेक्ट्रिक कार सध्या लोकप्रिय बनत आहे. या कारच्या बेस मॉडेलला 115 किमी पर्यंतची रेंज मिळते.

कंपनीच्या दाव्यानुसार जर तुम्ही ही इलेक्ट्रिक कार शहरामध्ये चालवणार असाल तर ती सिंगल चार्जमध्ये एक संपूर्ण आठवडा चालू शकते. त्यामुळे शहरामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक भन्नाट इलेक्ट्रिक कार ठरू शकते.

या कारमध्ये एक छोटी बॅटरी देण्यात आली आहे. मात्र त्याचा बॅटरी पॅक मजबूत देण्यात आला आहे. ही युरोपमधील क्लास L7e इलेक्ट्रिक कार आहे. या कारचे ९० टक्के घटक युरोपमध्ये बनवले जातात.

ही इलेक्ट्रिक कार सर्वात प्रथम स्वित्झर्लंडमध्ये उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. या इलेक्ट्रिक कारची अंदाजे किंमत 12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. मायक्रोलिनो ही इलेक्ट्रिक कार इटलीच्या टुरिन येथे कंपनीमध्ये बनवली जात आहे. प्लांट आपली उत्पादन क्षमता प्रति वर्ष 1500 वाहनांवरून 10 हजार वाहनांपर्यंत वाढवू शकतो.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts