EV Expo Delhi:- नुकताच दिल्ली येथील प्रगती मैदानावर ईव्ही एक्सपोचे आयोजन करण्यात आलेले होते व आज 22 डिसेंबर हा या एक्सपोचा शेवटचा दिवस होता. या एक्स्पोचे वैशिष्ट्य असे राहिले की यामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक वाहने व इतर महत्त्वाची उपकरणे सादर करण्यात आली.
या एक्सपोमध्ये 50 टन पेक्षा जास्त क्षमतेचे लोडर तसेच तीन चाकी, बाईक्स, फूड गाड्या, ट्रॅक्टर आणि ईव्ही इत्यादी घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते व यामध्ये आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स जोडलेल्या एक्सपोमध्ये बाईक्स, तीन चाकी आणि लोडर येत आहेत त्यांचा सहज मागोवा घेता येईल.
त्याचा फायदा असा होईल की वाहन चोरी झाले तर त्याला ट्रेकिंग करणे सोपे जाईल. तसेच ही वाहने लॉक देखील केले जाऊ शकतील व यामुळे कोणतेही दुसरे व्यक्ती या वाहनाचा किंवा बॅटरीचा वापर करू शकणार नाहीत.
सिटीअस कंपनीने सादर केला ई ट्रॅक्टर
या एक्सपोमध्ये सिटीएस कंपनीने ई ट्रॅक्टर्स( बलराज ET 207 आणि ET 250) सह अनेक वाहने या एक्सपो मध्ये सादर केली. हे सादर करण्यात आलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 20 एचपी आणि 50 एचपी LFP बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर असून ते 80 ते 280 किमीची रेंज देण्यासाठी सक्षम आहे तसेच दोन ते पाच टन वजन उचलण्यास देखील हे ट्रॅक्टर सक्षम असणार आहेत.
ईव्हीईवाय इलेक्ट्रिकने सादर केली व्हेस्पा प्राईम स्कुटी
ईव्हीईवाय या इलेक्ट्रिक कंपनीच्या माध्यमातून वेस्पा प्राईम स्कुटी लाँच केली असून तिची किंमत 56 हजार रुपये इतकी आहे व त्यासोबत एक वर्षाची वारंटी देखील देण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 50 ते 60 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे व लिथियम बॅटरीसह तिची किंमत 66 हजार रुपये असेल.
इतकेच नाही तर हरियाणा येथील मॅक्झिम ई व्हेईकल्सने दिव्यांगांसाठी दुचाकी सह अनेक इलेक्ट्रिकल वाहने देखील लॉन्च केली जी 80 km ची रेंज देतात. हे लीड बॅटरी लिथियम बॅटरीसह उपलब्ध असून लीड बॅटरी असलेले वाहन 65 हजार तर लिथियम बॅटरी असलेले वाहन 80 हजार रुपये सह उपलब्ध आहेत.
या एक्सपोमध्ये लाँच केले मुशाक नावाचे इलेक्ट्रिक पिकअप
मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेडने मुशाक नावाचे पिकअप/ लोडर वाहन लॉन्च केले जे हायड्रोलिक लिफ्टने सुसज्ज आहे व त्याची वजन उचलण्याची क्षमता 1000 kg असून 200 किमी पर्यंतची त्याची श्रेणी आहे.
इतकेच नाही तर जपानच्या टेरा मोटर्स या कंपनीने LFP बॅटरीसह D+3 L5 ऑटो ई रिक्षा लॉन्च केली. जी दीडशे किमी रेंज आणि 50 ते 55 कीमी प्रतितास अशा पद्धतीचा तिचा वेग आहे व तिची ऑन रोड किंमत सुमारे 3.75 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.