CNG Cars Tips : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. ऑटो मार्केटमध्ये सध्या सीएनजी कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिक नवीन कार खरेदी करताना सीएनजी कारच खरेदी करताना दिसत आहेत. या नागरिकांनी सीएनजी कारला पहिली पसंती दिली आहे. मात्र सीएनजी कार वापरत असताना उन्हाळ्यामध्ये अधिक काळजी घ्यावी लागते.
सीएनजी कार वापरत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या गाडीचा अपघात देखील होऊ शकतो. या अपघातामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला हानी देखील पोहचू शकते.
बदलत्या हवामानात तुम्हाला सीएनजी कारची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हीही सीएनजी कारचे मालक असाल तर खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला कधीही समस्या निर्माण होणार नाही.
कारमधील गॅसचे प्रमाण
तुमच्याकडेही सीएनजी कार असेल तर तुम्ही टाकीमध्ये गॅसची क्षमता जितकी आहे त्या क्षमतेपेक्षा २ ते ३ किलोने गॅस भरला पाहिजे. कारण उन्हाळ्यात, सीएनजी गाडीच्या आत थर्मलली विस्तारू लागतो. त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही क्षमतेपेक्षा कमी गॅस भरा.
सूर्यप्रकाशात पार्किंग
तुमची कार सीएनजी असेल तर तुम्ही ती नेहमी सावलीमध्ये पार्किंग करा. कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते. जर तुम्ही तुमची कार उन्हामध्ये पार्क केली तर तुमच्या कारला धोका निर्माण होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश प्रखर असतो त्यामुळे कारचे तापमान अधिक वाढते.
हायड्रॉलिक चाचणी
तुमच्याकडेही सीएनजी वाहन असेल तर तुम्ही वेळोवेळी हायड्रॉलिक चाचणी करून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या कारची हायड्रो टेस्ट बऱ्याच काळापासून केली नसेल, तर ती आता करून घ्या. अन्यथा, नंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
टाकी गळती
तुमच्या सीएनजी कारची गॅसची टाकीमध्ये गळती असेल तर त्वरित तुम्ही तुमच्या कारची गॅसची टाकी सर्व्हिसिंग करा. कारण जर गॅस गळती होत असेल तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. जेव्हा जेव्हा टाकी गळते तेव्हा थोडीशी ठिणगी बाहेर पडू लागते ज्यामुळे आग लागते.