CRETA Electric : भारतीय बाजारात दरवर्षी कित्येक कार लाँच होत असतात. यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. अशातच आता बाजारात ह्युंदाईची क्रेटा इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. दरम्यान कंपनीची ही तिसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे.
एकदा चार्ज केल्यानंतर जी 452 किमी रेंज देते. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण या कारपूर्वी Creta च्या ICE (पेट्रोल-डिझेल इंजिन) मॉडेलचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल सादर करण्यात येईल.
Hyundai ने अगोदरच भारतीय बाजारपेठेत तिच्या दोन इलेक्ट्रिक कारची विक्री करत असून, ज्यात Ioniq 5 आणि Kona यांचा समावेश आहे. अशातच आता कंपनीची ही तिसरी इलेक्ट्रिक कार लाँच केली जाणार आहे. Hyundai Creta ची सध्याची जेनरेशन मार्च 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीकडून या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या अगोदरच Creta च्या ICE (पेट्रोल-डिझेल इंजिन) मॉडेलचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल सादर केले जाणार आहे, त्यानंतर त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करण्यात येईल. हे मॉडेल 2025 पर्यंत ते बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान CRETA EV बद्दल कंपनीकडून अजूनही कोणतीच माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, क्रेटा इलेक्ट्रिक चेन्नईच्या रस्त्यावर स्पॉट झाली होती तसेच ती नंतर हरियाणाच्या कर्नालमध्येही स्पॉट झाली होती. हे प्रोटोटाइप मॉडेलसारखे दिसत असून जे सध्याच्या पिढीच्या मॉडेलवर आधारित असणार आहे.
कारची बाह्य रचना सध्याच्या ICE इंजिन मॉडेलसारखीच असेल, जरी पुढील आणि मागील बंपर किरकोळ बदलांसह पाहिले जाऊ शकते. विशेष म्हणजे, चाचणी मॉडेल कोणत्याही प्रकारे कव्हर करण्यात आले नव्हते.
बॅटरी
सध्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या पॉवर, परफॉर्मन्स किंवा बॅटरी पॅकबद्दल कोणतीही माहिती सध्या समोर आली नाही. परंतु असा विश्वास आहे की कंपनी KONA च्या धर्तीवर 39.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्याची शक्यता आहे, जे फक्त सिंगल चार्जमध्ये 452 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. परंतु त्याची इलेक्ट्रिक मोटर एकूण 134 bhp पॉवर आणि 395 Nm टॉर्क जनरेट करेल.
किंमत
सध्या Creta इलेक्ट्रिक टेस्टिंग मोडमध्ये असून कालांतराने त्यात बरेच बदल केले जाणार आहे. चाचणी मॉडेलमध्ये कोणतेही चार्जिंग पोर्ट दिलेले नाही त्यामुळे, अभियंत्यांनी चार्जिंग केबलला त्याचे बॉनेट उघडून जोडले. या मॉडेलमध्ये, कंपनी एसयूव्हीच्या पुढील बाजूस चार्जिंग पोर्ट ठेवेल. किमतीचा विचार केला तर कंपनी याला 20 लाख रुपयांच्या किंमतीत ऑफर करू शकते.