ऑटोमोबाईल

ग्राहकांना बसला मोठा फटका ! होंडा कंपनीच्या या कारची किंमत वाढली, नवीन Price List चेक करा

Honda Car Price Hike : नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या नवीन वर्षात अनेकजन नवीन कार खरेदी करणार आहेत. अशातच मात्र Honda या देशातील दिगच कार निर्मात्या कंपनीने आपल्या लोकप्रिय गाडीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने Elevate या midsize SUV ची किंमत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Midsize सेगमेंट मधील ही कार कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सादर केली होती. विशेष म्हणजे ही कार कमी कालावधीत विक्रीच्या बाबतीत मजबूत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहे.

मात्र आता Honda कंपनीने ही गाडी महाग केली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. कंपनीने Honda Elevate च्या सर्व प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या कारच्या नवीन किमतीं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कारच्या नवीन किंमती काय आहेत ?

मिळालेल्या माहितीनुसार, Honda Elevate च्या SV MT व्हेरियंटची किंमत पूर्वी 10.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपासून सुरू होत होती. मात्र आता हा प्रकार महाग झाला आहे. हा प्रकार आता 58 हजार रुपयांनी महाग झाला आहे.

आता या कारची नवीन किंमत 11.57 लाख रुपये एवढी झाली आहे. दुसरीकडे या कारच्या दुसऱ्या व्हेरियंटच्या किमती तुलनेने कमी वाढलेल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीच्या इतर व्हेरियंटच्या किमती जवळपास 20,000 रुपयांनी वाढल्या आहेत.

यामुळे ही कार खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. या कारच्या ZX CVT, Honda Elevate च्या टॉप व्हेरिएंटची किंमत आता 16.19 लाख रुपये एवढी झाली आहे. निश्चितच जर तुम्हाला ही नवीन गाडी खरेदी करायची असेल तर तुम्हाला या नवीन वर्षात अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे. मित्रांनो आम्ही सांगितलेले या सर्व किमती एक्स शोरूम आहेत. ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहील याची काळजी घ्यायची आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts