ऑटोमोबाईल

Maruti Suzuki : बजेटची चिंता सोडा…! अर्ध्या किंमतीत घरी आणा Maruti WagonR…

Maruti WagonR : जर तुम्ही सध्या सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आम्ही मारुती वॅगनआर बद्दल बोलत आहोत. ही कार तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळेल. तुम्हाला ही कार कुठे आणि किती किंमतीत मिळेल पाहूया…

तुम्हाला माहितीच असेल मारुती सुझुकीच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये अनेक कार आहेत. ज्यामध्ये मारुती वॅगनआरचाही समावेश आहे. कंपनीच्या या कारमध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट डिझाईन पाहायला मिळते. या कारचे नाव कंपनीसह देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत येते. जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया…

तुम्हाला या कारमध्ये 1197 सीसी इंजिन पाहायला मिळेल. ज्यामध्ये 6000 rpm वर 88.50 bhp ची कमाल पॉवर आणि 4400 rpm वर 113 Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. यात 341 लीटरची बूट स्पेस देखील आहे. कंपनी 24.43 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते.

किंमत

मारुती वॅगनआर 5.54 लाख ते 7.38 लाख रुपयांपर्यंत बाजारात सादर करण्यात आली आहे. तथापि, तुम्ही ही कार ऑनलाइन सेकंड हँड कार ट्रेडिंग वेबसाइटवरून यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

तुम्ही Cardekho वेबसाइटवरून 2015 मॉडेल मारुती WagonR खरेदी करू शकता. ही कार अतिशय चांगल्या स्थितीत असून ही कार आतापर्यंत 10,000 किलोमीटर पर्यंत चालली आहे. तसेच ही कार तुम्हाला 3.25 लाख रुपयांच्या किंमतीत मिळत आहे.

Cardekho वेबसाइटवर मारुती WagonR चे 2016 चे मॉडेल देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारची स्थिती चांगली असून तिच्या मालकाने ती 88,060 किलोमीटर चालवली आहे. ही कार पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. यासाठी 3.29 लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts