MSRTC News : एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रयत्न सुरू आहेत. अशातच एसटीच्या ताफ्यात नवीन २० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती.
या निविदा अंतर्गत एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्याअंतर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.
यापैकी २० बसेस डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून टप्याटप्याने पुढील २ वर्षांत सर्व ५१५० ई-बसेस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटी बसेसचा तुटवडा, होणारे अपघात, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत प्रवाशांच्या तुलनेने एसटी बसेस मार्गावर धावण्यासाठी एसटी महामंडळ नव्या बसेस दाखल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्याअंतर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस यांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी २० मिडी बसेस डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून ३५ आसने असणारी ही मिडी बस वातानुकूलित आहे.
M/s Evey Trans प्रा. लि. या कंपनीने ई-बसेस एसटीला भाडेतत्त्वावर पुरवण्याचे कंत्राट घेतले आहे. दरम्यान, या गाड्यांची पुढील काही दिवस चाचणी एसटी महामंडळाकडून घेतली जाणार आहे. त्यानंतर समितीद्वारे ठरवण्यात आलेल्या तिकीट दरासह धावणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.