Electric Bike News:- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते चार वर्षाच्या कालावधीपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे कल दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीकडे वळले आहेत.
यामध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार तसेच दुचाकी व स्कूटर्स तयार केलेले आहेत. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये देखील अनेक नामांकित कंपन्या असून यामध्ये जर आपण इलेक्ट्रिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये प्युअर ईव्ही ही कंपनी देखील खूप प्रसिद्ध आहे. याच कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण अशी इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केलेली आहे व या बाईकचे नाव आहे Pure ecoDryft 350 हे होय.
Pure ecoDryft 350 इलेक्ट्रिक बाइकचे वैशिष्ट्ये
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इलेक्ट्रिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्युअर ईव्हीने ग्राहकांकरिता एक वैशिष्ट्यपूर्ण अशी नवीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली असून या बाईकचे नाव Pure ecoDryft 350 हे आहे. तुम्हाला जर ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही या कंपनीच्या अधिकृत वितरकामार्फत ती बुक करू शकतात.
कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या प्रकारची ड्रायव्हॅबिलिटी रेंज ही बाईक देते असा कंपनीने दावा केला असून प्रत्येक महिन्याला 7000 रुपयांची बचत ग्राहकांची ही बाईक करेल असे देखील कंपनीने म्हटले आहे. एवढेच नाही तर ही बाईक तीन वेगवेगळ्या मोड्समध्ये ग्राहकांना मिळणार आहे. या इलेक्ट्रिक बाइक मध्ये कंपनीने 3.5kWh लिथियम आयन बॅटरी वापरली असून जी 6 MCU आणि चार एचपी इलेक्ट्रिक मोटरसह येते.
तसेच या इलेक्ट्रिक बाइक सोबत तुम्हाला 75 किलोमीटर प्रति तासचा टॉप स्पीड देखील मिळणार आहे जो 40Nm टॉर्क जनरेट करेल. जर आपण या बाईकची रेंज पाहिली तर फुल चार्ज केल्यावर 171 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापेल असे देखील कंपनीने म्हटले आहे.
या इलेक्ट्रिक बाइक मध्ये रिव्हर्स मोड, हिल स्टार्ट असिस्ट ते डाऊन हिल असिस्ट आणि पार्किंग असिस्ट अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.तसेच कंपनीने म्हटले आहे की स्टेट ऑफ चार्ज आणि स्टेट ऑफ हेल्थ त्यानुसार पाहिले तर या बाईकची स्मार्ट एआय टेक्नॉलॉजी बॅटरीचे आयुष्य हे दीर्घ कालावधी करिता सुनिश्चित करते.
किती आहे या इलेक्ट्रिक बाईकची किंमत?
Pure ecoDryft 350 या इलेक्ट्रिक बाइक ची किंमत पाहिली तर ती सुरुवातीची किंमत एक लाख तीस हजार रुपये( एक्स शोरूम) इतकी ठेवण्यात आलेली आहे.