Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. ती म्हणजे देशातील एका प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्मात्या कंपनीने आपल्या एका लोकप्रिय स्कूटरवर 25 हजार रुपयांचा मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. त्यामुळे जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्हाला आता स्वस्तात स्कूटर खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ओला या कंपनीने आपल्या S1 या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व वॅरियंटवर 25 हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर सुरू केला आहे. कंपनीच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन डे ऑफर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व प्रकारांवर 25 हजार रुपयांची सूट मिळत आहे.
दरम्यान ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थातच 31 मार्च 2024 पर्यंत ही स्कूटर खरेदी करणाऱ्यांना कंपनीकडून 25 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
यात 2kWh, 3kWh आणि 4kWh बॅटरी पॅक पर्याय आहेत. एवढेच नाही तर ही ई-स्कूटर तुम्ही 7 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. अर्थातच ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कलर मिळणार आहेत.
खरेतर केंद्र सरकारने ३१ मार्चनंतर इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मात्या कंपन्यांना दिली जाणारी सबसिडी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मात्या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक व्हेईकलवर या चालू महिन्यात मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
ओला या कंपनीने देखील आपल्या S1 या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर वर 25 हजाराचा डिस्काउंट दिला असून ही ऑफर 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे ही स्कूटर खरेदीसाठी हा महिना फायद्याचा राहणार आहे. या चालू महिन्यात ग्राहकांना ही स्कूटर स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
Ola S1 स्कूटरच्या ताज्या किंमती
S1 Pro : ही स्कूटर एक लाख 29 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
S1 Air : ही स्कूटर एक लाख 4 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
S1X (4kWh) : ही स्कूटर एक लाख 9 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
S1X+(3kWh) : ही स्कूटर 84 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
S1X(3kWh) : ही स्कूटर 89 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.
S1X(2kWh) : ही स्कूटर 79 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.