Electric Scooter : सध्या इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. बाजारातील झपाट्याने वाढलेली इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी पाहता आता अनेक कंपन्या आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या स्कुटर लाँच करू लागल्या आहेत.
परंतु ग्राहकवर्ग सर्वात जास्त रेंज देणाऱ्या स्कुटरची खरेदी करत आहेत. बाजारात एक अशी स्कुटर आहे जी तब्बल 181 किमी रेंज देते. शिवाय ग्राहकांना ही स्कुटर त्यांच्या बजेटमध्येही खरेदी करता येईल. जाणून घेऊयात या स्कुटरबद्दल सविस्तर माहिती.
Ola S1 Pro
Ola S1 Pro ही एक भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रसिद्ध इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे, ज्या पद्धतीने Ola ने देशात आपले स्थान निर्माण केले आहे, लोक देखील कंपनीची स्कूटर मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत, कंपनीची ही स्कूटर पूर्णपणे फीचर लोड आहे. किमतीचा विचार केला तर या स्कुटरची किंमत 1.50 लाख रुपये इतकी आहे. यात 181 किमी रेंज मिळेल, असा दावा कंपनी करते. हे 4 kWh बॅटरी पॅकसह येते. शिवाय स्कुटर चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स सहज उपलब्ध होतात.
Vida V1 Pro
भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी Hero कडून ही शानदार इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यात आली आहे, किमतीचा विचार केला तर या स्कुटरची किंमत 1.25 लाख रुपये इतकी आहे. 3.94 kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित, Vida V1 Pro एका चार्जवर 165 किमीची रेंज देईल, असा कंपनीने दावा केला आहे.
Ather 450X
भारतीय बाजारपेठेत अथर देखील झपाट्याने आपले नाव कमावत आहे. ही एक स्टार्टअप कंपनी असून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन वेगवेगळे बॅटरी बॅक पर्याय देण्यात आले आहेत. 3.7 kWh आणि 2.9 kWh. मोठी बॅटरी 150 किमी रेंज आश्वासन देते.
Simple one
Simple one ही भारतीय बाजारपेठेत आणखी एक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्वरूपात येते. किमतीचा विचार केला तर या स्कूटरची किंमत 1.45 लाख रुपये इतकी आहे. कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय स्पोर्टी लूकसह येते. ती एका चार्जमध्ये तब्बल 212 किलोमीटरची रेंज देते, असा कंपनीने दावा केला आहे. तसेच कंपनीकडून यात अनेक दमदार फिचर्सही देण्यात आले आहेत.