Electric Scooter Offer:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत असून या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक तसेच इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायदेशीर असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात देत आहे.
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती अनेक कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असून जर आपण इलेक्ट्रिक स्कूटरच्या दृष्टिकोनातून बघितले तर इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप म्हणून पुढे आलेली काँटम एनर्जी ही कंपनी तिच्या नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सकरिता खास करून ओळखली जाते.
या कंपनीने आता आपल्या प्लाझ्मा एक्स आणि प्लाझ्मा एक्सआरवर मर्यादित कालावधी करिता ऑफर जाहीर केलेली असून ग्राहकांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून क्वाँटम एनर्जीने या दोन्ही मॉडेलच्या किमतींमध्ये दहा टक्क्यांनी कपात केली आहे.
काय आहेत काँटम एनर्जीच्या प्लाझ्मा एक्सची वैशिष्ट्ये?
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पावरफूल अशी 1500 डब्ल्यू मोटार आणि 60 व्ही 50 एएच लिथियम आयन बॅटरी सह सुसज्ज असून तिचा कमाल वेग हा 65 किलोमीटर प्रतितास इतका आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 110 किलोमीटरच्या प्रभावी श्रेणी सह केवळ साडेसात सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रतितास पर्यंत जलद प्रवेग म्हणजेच रॅपिड एक्सेलरेशन मिळवते.
तसेच यामध्ये केले स्टार्ट आणि रिव्हर्स गियर इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आलेली असून अनेक अतिरिक्त सोयीसह रायडर्स, इको आणि स्पोर्ट्स या दोन ड्राइव्ह पद्धतीमधून तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेलची निवड करता येईल.
काँटम एनर्जीच्या प्लाझ्मा एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये
यातील प्लाझ्मा एक्सआर हे इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल 60 किलोमीटर प्रतितास अशी सर्वांच्च गती देते व एका चार्जवर 100 किलोमीटरची रेंज देखील देते. ही दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल दैनंदिन प्रवासाकरिता तसेच कॉलेजचे विद्यार्थी व ऑफिसला जाणारे कर्मचारी,
तात्पुरत्या कामगारांसाठी उपयोगी आहेत. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेलवर मर्यादित कालावधीकरिता ऑफर देण्यात आलेली असून ही ऑफर केवळ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती कमी करणे आणि विक्री वाढवणे इत्यादीसाठी नसून ते ग्राहकांना काँटम एनर्जी कंपनीशी जोडणे असल्याचे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चक्रवर्ती सी यांनी म्हटले.
तसेच ज्या कुणाला हे इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल खरेदी करायचे असतील असे इच्छुक खरेदीदार काँटम एनर्जीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन चाचणी राईड शेड्युल करू शकतात किंवा संपूर्ण भारतभरातील कोणत्याही शोरूमला भेट देऊ शकतात.