ऑटोमोबाईल

Electric Scooters : बॅटरी स्वॅपिंगवाली बाऊन्स इन्फिनीटी फक्त 499 रुपयांमध्ये करता येणार बुक; कमी किमतीत भन्नाट फीचर्स

Electric Scooters : भारतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर केल्या जात आहेत. अशाच एका कंपनीने, इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्ट अप बाऊन्सने आपली स्कूटर सादर केली आहे. ज्यामध्ये बॅटरी पुन्हा-पुन्हा चार्ज करावी लागणार नाही.

जाणून घ्या किंमत ?

इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ती ₹ 45099 आहे. आणि तुम्ही हि सकूटर फक्त ₹ 499 मध्ये बुक करू शकता. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

कंपनीचे सीईओ विवेकानंद याचा असा दावा आहे, “या स्कूटरमध्ये तुम्हाला बॅटरी स्वॅपिंगची सुविधा मिळेल.जेणेकरून तुम्हाला त्याची बॅटरी चार्ज करावी लागणार नाही. होय, आता रिकामी बॅटरी देऊन तुम्ही चार्ज केलेली बॅटरी मिळवू शकता.”

जाणून घ्या वैशिष्ट्य?

ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही बॅटरीसह देखील खरेदी करू शकता. तुम्ही ते कुठेही सहज चार्ज करू शकता. कंपनीने त्याची किंमत ₹ 68999 ठेवली आहे. यामध्ये तुम्हाला 2K WH रिमूव्हल बॅटरी देखील सहज मिळेल. एका चार्जमध्ये हि स्कुटर 85Km पर्यंत धावू शकते.

तुम्ही याचे चार्जिंग कोणत्याही सॉकेटमधून चार्ज करू शकाल आणि 4 ते 5 तासांत ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होईल. त्याचा टॉप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास आहे. तो 8 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाची रेंज देईल.

हे 93Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये पॉवर आणि इको मोड असे दोन मोड उपलब्ध आहेत. वॉरंटीबद्दल बोलायचे झाले तर कंपनी 3 वर्षे 50,000 किलोमीटरची वॉरंटी देईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts