ऑटोमोबाईल

Electric Tractor: ट्रॅक्टरसाठी डिझेलची चिंता सोडा! अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात विक्रीसाठी दाखल

Electric Tractor :- शेतीमधील यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून ट्रॅक्टर हे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे यंत्र असून शेतीची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतरमशागतीची कामे आणि पिकांची काढणी व बाजारपेठेपर्यंत शेतीमाल नेण्याकरिता ट्रॅक्टरचा वापर केला जातो. ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीतील अनेक कामे ही कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चामध्ये करणे शक्य झाले आहे.

त्यामुळे बरेच शेतकरी आता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले असून ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे देखील कल दिसून येतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ट्रॅक्टरचा वापर सध्या परिस्थितीला डिझेलचे दर वाढल्यामुळे खूप खर्चिक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डिझेल शिवाय चालणारे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी येणे खूप गरजेचे होते. त्यामुळे आता प्रीमा ईटी 11 हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सीएसआयआरने विकसित केला आहे.

 सीएसआयआरचा प्रीमा ईटी 11 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बऱ्याचदा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार केला तर अशा शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करणे परवडत नाही किंवा अनेक प्रकारच्या अडचणी येतात व मोठ्या ट्रॅक्टरच्या किमती या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच्या असल्यामुळे त्यांना ते खरेदी करणे देखील परवडत नाही. याच अनुषंगाने सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सीएसआरआयने प्रीमा ईटी 11 हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला असून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर असा ट्रॅक्टर आहे.

या ट्रॅक्टरला जर सात ते आठ तास पूर्ण चार्ज केले तर चार तास शेतीमध्ये आरामात तो काम करू शकतो. एवढेच नाही तर पिकांवर फवारणी सारखे कामे देखील अगदी आरामात या ट्रॅक्टरच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. महिलांच्या दृष्टिकोनातून हे ट्रॅक्टर खूप महत्त्वाचे असून महिला देखील हे ट्रॅक्टर अगदी आरामशीरपणे व सहजतेने चालवू शकतात. जर वजन ओढण्याची क्षमता पाहिली तर 1.8 टन वजनाची ट्रॉली हे ट्रॅक्टर अगदी आरामांमध्ये ओढू शकते असा देखील दावा या इन्स्टिट्यूटने केलेला आहे. लवकरच कुशल या नावाने हा ट्रॅक्टर बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे.

 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी बँकांकडून मिळते इतके कर्ज

देशातील कृषी यांत्रिकीकरणाला चालना मिळावी याकरिता केंद्र सरकारकडून देखील सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे कृषी ट्रॅक्टर खरेदीकरिता कर्जाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे. साधारणपणे ग्रामीण भागाचा विचार केला तर सणासुदीच्या काळामध्ये मुहूर्त पाहून अनेक ट्रॅक्टर विकत घेतले जातात व याचा अनुषंगाने शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरामध्ये ट्रॅक्टरची खरेदी करता यावी

यासाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलेला आहे. त्यामुळेच आता सात वर्ष मुदतीचे आणि ट्रॅक्टरच्या किमतीच्या 90% कर्ज बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन या संबंधीची माहिती मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts