Electric Scooter :- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पासून ते इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी करण्यात येत आहेत व अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य असलेले इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत सादर केलेली आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्या वैशिष्ट्यपूर्ण व परवडण्याजोग्या किमतीतील इलेक्ट्रिक वाहनांचे वेगवेगळे मॉडेल बाजारामध्ये लॉन्च करत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत बघितले तर फुजीयामा इव्ही क्लासिक ई स्कूटर भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. जबरदस्त रेंज व टॉप स्पीड असलेली इलेक्ट्रिक स्कूटर असून रायडर्सना उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव देण्यासाठी सक्षम आहे. तसे पाहता ही स्कूटर आधुनिक रायडर्सच्या गरजेनुसार लॉन्च करण्यात आलेली आहे.
काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये?
ही स्कूटर तीन हजार वॅट पीक पावर मोटरसह लॉन्च करण्यात आलेली असून हीचा टॉप स्पीड 60 किमी प्रति तास इतका आहे. एवढेच नाही तर ती एका चार्जेवर 120 किलोमीटर पर्यंत चालवता येणे शक्य आहे. तिला चार्जिंगची कुठल्याही प्रकारची चिंता न करता बराच वेळ पर्यंत आपण फिरवू शकतात.
या इलेक्ट्रिक स्कूटरला संपूर्णपणे चार्ज होण्याकरिता चार तासांचा कालावधी लागतो. तसेच या स्कूटरमध्ये CAN कनेक्टिव्हिटी सह डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी चांगली दिसावे याकरिता त्यामध्ये ट्वीन बॅरल एलईडी दिवे देण्यात आलेले आहेत.
तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कॉम्बी ड्रम ब्रेक सिस्टम देण्यात आले आहे. फुजीयामा ईव्ही क्लासिकमध्ये मोठे बारा इंच ट्यूबलेस टायर देण्यात आलेले असून ही स्कूटर वजनाने खूप हलकी आहे. या स्कूटर च्या मागच्या चाकामध्ये एक पावरफुल हब मोटर इन्स्टॉल करण्यात आलेली आहे.
किती आहे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत?
फुजीयामा ईव्ही क्लासिकची एक्स शोरूम किंमत 79 हजार 999 रुपये इतकी ठेवण्यात आलेली असून तुम्हाला जर या स्कूटरला बुक करायचे असेल तर तुम्ही एक हजार 999 रुपयांमध्ये बुकिंग करू शकणार आहात.